---Advertisement---

कै. मल्लिनाथ स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गरजूंना ब्लँकेट वाटप

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, प्रतिनिधी : कै. मल्लिनाथ बंडय्या स्वामी यांच्या तृतीय पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोट शहरातील गरजू नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात आली. वडिलांनी दिलेले माणुसकी, सेवाभाव आणि गरजूंना मदत करण्याचे संस्कार पुढे नेण्याच्या उद्देशाने शिवशंकर मल्लिनाथ स्वामी यांच्या पुढाकारातून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.

शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर, शेख नूरदिन बाबा दर्गा परिसर तसेच विविध झोपडपट्टी भागांमध्ये राहणाऱ्या गरजू आणि वयोवृद्ध नागरिकांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. सध्या थंडीचा कडाका वाढत असल्याने या उपक्रमातून गरजू नागरिकांना दिलासा मिळाला आहे. वडिलांच्या स्मृती जपत त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेण्याचा हा उपक्रम असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

या वेळी ओम जिरगे, प्रभाकर म्हेत्रे, राज मद्रिकर, सागर शुक्ला, खंडू चंडके, राहुल वाडे, नितीन उनोळी, धनराज पाटील यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!