ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रभाग पद्धतीवर घेण्यात आला महत्त्वाचा निर्णय

मुंबई : राज्यातील महापालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणूकांमध्ये दोन सदस्य प्रभाग असावा अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांची होती तर शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंची ही सदस्य संख्या चार असावी अशी मागणी होती अखेर या दोन्हींचा सुवर्णमध्य म्हणजेच यामध्ये मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये महापालिकेत तीन सदस्य प्रभाग पद्धत ठेवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्या बैठकी नंतर जाहीर करणार आहेत.

राज्यात महापालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत बहुसदस्य प्रभाग पद्धत असणार असा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळामध्ये घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये महापालिकेत तीन सदस्य प्रभाग पद्धत ठेवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय घेण्यात येणार असल्याचेहि सांगण्यात आली आहे.

राज्यातील महापालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीची दोन सदस्य प्रभाग असावा अशी भूमिका होती, तर शिवसेनेची चार सदस्य असावा अशी मागणी होती मात्र अखेर तीन सदस्य प्रभाग पद्धतीला मंत्रीमंडळाने मंजूरी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!