केंद्राकडे महाराष्ट्राचे द्यायला ३८ हजार कोटी नाहीत तर बिहारमध्ये मोफत लस द्यायला पैसे आले कुठून ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात भाजपला सवाल
मुंबई, दि.२५ : केंद्राकडे महाराष्ट्राचे ३८ हजार कोटी देणे द्यायला पैसे नाहीत, बिहारमध्ये फुकट लस
द्यायला पैसे येतात कुठून ? हा सरळसरळ दुजाभाव
आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पन्नास लोकांच्या उपस्थितीत मुंबईतील सावरकर सभागृहात आयोजित दसरा मेळाव्यात
ते बोलत होते.प्रारंभी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पुढे बोलताना ठाकरे म्हणाले की, आमच्या हिंदुत्वाबद्दल कोणी बोलू नये,पहिल्यांदा स्वतः किती हिंदुत्ववादी आहोत,
हे तपासून बघावे.बिहारमध्ये निवडणुकीनंतर जर मोफत लस देणार असाल तर देशाचा उर्वरित भाग हा बांगलादेश आणि पाकिस्तान आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.केंद्राकडे जून महिन्यापासून आम्ही आपत्तीग्रस्तांना पैसे मागत आहोत. एक रुपयासुद्धा राज्याला दिला नाही.
सरकार पाडण्यासाठी अनेक जण प्रयत्न करत आहेत परंतु हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा,असे खुले आव्हान भाजपला ठाकरे यांनी दिले.पाकव्याप्त काश्मीर भारतात आणून दाखवू, असे मोदींनी निवडणुकीवेळी आश्वासन दिले होते परंतु त्याचे पुढे काय झाले ?
आज दसऱ्याच्या निमित्ताने सरसंघचालक मोहन भागवत यांनी चांगले मुद्दे मांडले. त्यांच्या हिंदुत्ववादी मुद्याचा तरी किमान विचार करा,असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.काही कामे आम्ही करत आहोत.नुसते बोलून थांबत नाही,केवळ महाराष्ट्र पुढे जातो आहे म्हणून महाराष्ट्राची बदनामी केली जाते.महाराष्ट्रमध्ये जणूकाही कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात नाही,मुंबई पोलीस काम करत नाहीत आणि त्याहीपेक्षा भयंकर म्हणजे सगळे झाले की जणूकाही महाराष्ट्र मध्ये शिवाजी पार्करवरती गांजा शेती केलेली आहे,असे चित्र रंगवले जात आहे. मुंबई महाराष्ट्र पोलीस निकमी आहे,काही करत नाहीये. त्यांना माहिती नाही अजून
ह्या महाराष्ट्राची संस्कृती.त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये आमच्या घराघरांमध्ये तुळशीवृंदावन आहेत.तुमच्या काळात महाराष्ट्राची वाट लागलेली आहे आणि मला
त्या पोलिसांबद्दल पोलीसाबद्दल अभिमान
आहे.ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आणि पुन्हा तेच खरे म्हणजे पाकव्याप्त काश्मीर कधी भारतात येणार,हा माझा सवाल आहे. सहा वर्षात पाक व्याप्त काश्मीर आपल्या देशामध्ये येऊ शकत नाही पण तीच परिस्थिती देशांमध्ये तयार होत असतील तर ते अपयश हे पंतप्रधानांचे आहे,अशी टीका देखील त्यांनी केली.आपल्या एक तासाच्या भाषणात त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
महत्वाचे मुद्दे : –
शिवसेना दसरा मेळावा २०२०
बेडकाच्या पिलाने वाघ पाहिला, वाघ पाहून तो लपला, मुख्यमंत्र्यांची राणे पिता पुत्रांवर जोरदार टीका –
महाराष्ट्राच्या मातीतून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे तेज जन्माला आलं, ते तेज कायम आहे.
हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारले जातात का तर मंदिरं उघडले नाहीत म्हणून.. पण आम्हाला कोण विचारतंय… ज्यावेळी बाबरी पाडली त्यावेळी हे शेपट्या घालून बसले होते –
घंटा बडवा थाळ्या बडवा हे तुमचं हिंदुत्व, आमचं हिंदुत्व असलं नाही, हिंदुत्व हे आमचं राष्ट्रीयत्व –
हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा,
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे विरोधकांना आव्हान
इथे गाय म्हणजे माता आणि पलीकडे जाऊन खाता –
सरसंघचालकांकडून हिंदुत्व शिकून घ्या, संजयजी उद्याच्या सामनात सरसंघचालकांचं भाषणं व्यवस्थित आलं पाहिजे –
देव, मंदिर, पूजा, अर्चा हे आमचं हिंदुत्व नाही, बाळासाहेबांनी सांगितलेलं आमचं हिंदुत्व –
कोरोना आहे, संकट आहे, जीएसटी नाही, पैसे येणार कुठून, जीएसटीची प्रणाली फसली असेल तर पंतप्रधानांनी आपली चूक मान्य करावी –
सर्व मुख्यमंत्र्यांनी जीएसटी रद्द करण्याची मागणी करावी, जीएसटी फेस गेली असेल तर पंतप्रधानांनी माफी मागावी –
देश संकटात आहे आणि भाजप राजकारण करतंय, हा देश म्हणजे कोणाच्या बापाची मालमत्ता नाही-
संघमुक्त भारत हवे म्हणणारे नितीश कुमार भाजपला कसे चालतात-
बिहारमध्ये मोफत लस, मग आम्ही काय बांगलादेशचे?? –
रावसाहेब दानवेंचा बाप दिल्लीत असेल माझा बाप भाडोत्री नाही, आमचे जीएसटीचे पैसे मिळायलाच हवेत –
मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणारा रावण आलाय, मुंबईत यायचं आणि इथल्या मातेशी नमकहरामी करायची, मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या कंगनावर मुख्यमंत्र्यांचा प्रहार
इथं काम करणारी पोरं महाराष्ट्राच्या मातीतली हवी-
आमच्या अंगावरती येत आहात,महाराष्ट्र द्वेष पाहिल्यानंतर मी महाराष्ट्राच्या जनतेला आवाहन करतो, सावध राहा
आदित्य, ठाकरे कुटुंबावर चिखलफेक झाली हे भयंकर होतं. बिहारच्या सुपुत्रार चिखलफेक करणारे महाराष्ट्राच्या सुपुत्रावर चिखलफेक करतायेत-
तुम्ही रातोरात झाडांची कत्तल करत होता, आम्ही 808 एकर जंगल वाचवलं, एक नवा पैसाही खर्च न करता कारशेड उभारतोय-
महाराष्ट्रात आता कळसूत्र्या बाहुल्यांचा खेळ होणार नाही, पाडापाडी करण्यात भाजपला रस आहे, ही अराजकता आहे-
बिहारच्या जनतेने प्रलोभनांना बळी न पडता मतदान करावं, कोणाला करावं हे मी सांगणार नाही, फक्त डोळे उघडे ठेवून मतदान करा-
मराठा, धनगर, आदिवासी, सगळ्या समाजाला न्याय देणार, कुणाचंही आरक्षण काढून न घेता सगळ्यांना मी न्याय देईन.