मैंदर्गी,दि.२५ : देवी शक्ती म्हणजे स्त्रीशक्ती,म्हणून श्री सिद्धाश्रम विरक्त मठ मैंदर्गी व बसवेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट मैंदर्गी यांच्या संयुक्त विद्यमाने आदिशक्ती कित्तूर राणी चन्नम्मा यांच्या २४२ जयंती निमित्ताने सिद्धाश्रम मठ येथे १०८ कन्यांचा वोटी भरण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.यानिमित्ताने १०८ मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप श्री बसवेश्वर चारीटेबल ट्रस्ट मैंदर्गी चे अध्यक्ष महेश शावरी यांच्याकडून वही, पेन, पेन्सिल, खोडरबर, पट्टी, मास्क, सॅनिटीझर वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. अशा प्रकारचे उपक्रम या पुढील काळात आपण निश्चित करणार आहोत,असे शावरी यांनी सांगितले.










