२ ऑक्टोबरला दुधनीत सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम ; मंत्री छगन भुजबळ यांच्यासह विविध मान्यवरांची मांदियाळी
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट, दि.२६ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे येत्या २ ऑक्टोबर रोजी लोकनेते स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी दिली.शनिवारी सकाळी १० वाजता म्हेत्रे मळा दुधनी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे व स्वर्गीय मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण व स्मृतीस्थळ कळसारोहण समारंभ,भव्य रक्तदान शिबिर,कोरोना योद्धा यांचा सत्कार,कोविड लसीकरण तसेच सातलींगप्पा म्हेत्रे यांच्या जीवन चरित्रावरील पुस्तकाचे प्रकाशन राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे राहणार आहेत.तर यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल.हे सर्व कार्यक्रम श्रीशैल महापिठाचे जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ.चन्नसिद्धाराम पंडिताराध्य शिवाचार्य यांच्या दिव्य सानिध्यात होणार असून यावेळी ष. ब्र. डॉ.गंगाधर शिवाचार्य महास्वामीजी, डॉ.चन्नमल्लेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, हवा मल्लिनाथ महाराज,ष. ब्र. महांतेश्वर महास्वामीजी,जयगुरुशांतलिंगराध्य शिवाचार्य महास्वामीजी,प.पु. देविदास महाराज,डॉ. इनामदार गुरुवर्य, संतपुरुष शिवाजी महाराज ,डॉ.मृगराजेंद्र महास्वामीजी,डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी,ष. ब्र. बसवलिंग महास्वामीजी,ष. ब्र. अभिनव बसवलिंग महास्वामीजी,ष. ब्र. रेणुक शिवाचार्य महास्वामीजी,ष. ब्र. मळेंद्र शिवाचार्य
हिरेमठ महास्वामीजी ,ष. ब्र.अभिनव शिवलिंगेश्वर महास्वामीजी, हजरत सय्यद साहेब उर्फ सज्जेद नसिन कुतबी हुसेन आदीं महास्वामींजींची उपस्थिती राहणार आहे.
यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी आमदार बी. आर .पाटील ,आमदार एम .वाय. पाटील, आमदार यशवंतराव पाटील, आमदार प्रियंक खर्गे,आमदार अप्पूगौडा पाटील, आमदार बसवराज मत्तीमोड, आमदार सुशील नमोशी ,माजी आमदार बाबूराव चिंतनसुर ,माजी मंत्री बसवराज पाटील,भालकीचे आमदार ईश्वर खंडरे ,आमदार प्रणिती शिंदे, सुभाष गुत्तेदार मलिकय्या गुत्तेदार, आमदार डॉ.अजयसिंह धरमसिंह ,माजी मंत्री शरणप्रकाश पाटील, माजी आमदार तिप्पणप्पा कमकनूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.त्याशिवाय या कार्यक्रमास तालुक्यातील, नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती ,सरपंच,सोसायटी अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, सर्व म्हेत्रे प्रेमी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे व बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे व संयोजन संमतीने केले आहे.