ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्रात पंचगव्य शास्त्र क्रांती घडविणार : डॉ.तृप्ती डिग्गे,पंचगव्य व आयुर्वेद उत्पादन प्रशिक्षणाची अक्कलकोट येथून उद्या सुरुवात

 

अक्कलकोट, दि.१० : समाजातील जनमाणसांचा आरोग्याचा स्तर उंचवायचा असेल तर प्राचीन आयुर्वेद विज्ञान
व भारतीय गोवंशाच्या गायीच्या विज्ञानशिवाय पर्याय नाही. प्राचीन आयुर्वेद व पंचगव्य यांचे विज्ञान घरोघरी पोहचवण्यासाठी प्रत्येक जिल्हास्तरावर पंचगव्य उत्पादने व सेंद्रिय शेती उत्पादने यांचे प्रशिक्षणाचे आयोजन करणार असल्याचे आयुर्वेद गोविज्ञान परिषदेचे सदस्य डॉ.तृप्ती डिग्गे -तानवडे यांनी दिली.

याची सुरुवात उद्या अक्कलकोट येथून होत आहे.त्यानिमित्त दि.२७ व २८ ऑक्टोबर रोजी अक्कलकोट येथे मल्लिकार्जुन सांस्कृतिक सभागृह सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पार पडणार आहे. आयुर्वेद गोविज्ञान परिषदेच्या माध्यमातून पंचगव्य प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात देशी गोमातेच्या पंचगव्यांतून विविध उत्पादनांची निर्मिती, गोशाळा व्यवस्थापन, सेंद्रिय शेती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

अक्कलकोट व पंचक्रोशीतील असंख्य शेतकरी, नवयुवक व महिला या कार्यक्रमास उपस्थित राहावे,असे आवाहन करण्यात आले. अक्कलकोट येथील समाजसेविका श्रीमती शकुंतला तानवडे यांचाही यासाठी पुढाकार आहे.दोन दिवसाच्या या शिबिरात आयुर्वेद गोविज्ञान परिषदेचे प्रमुख विवेक भोसले, स्वानंद पंडित,डॉ. तृप्ती डिग्गे, डॉ. प्रदिप शेळके, डॉ. संतोष वैद्य, डॉ. रविंद्र अडके हे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.या पत्रकार परिषदेला अक्कलकोट विरक्त मठाचे बसवलिंग महास्वामीजी, सुरेश डिग्गे, दत्तकुमार साखरे, राजशेखर उमराणीकर, प्रेमराज डिग्गे,शकुंतला तानवडे आदी उपस्थित होते.हा उपक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात राबवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले .

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!