दुधनीतील कार्यक्रमासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवावी, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचे अक्कलकोटमध्ये आवाहन
अक्कलकोट, दि.२९ : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कोरोना महामारीमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने तालुक्यातील बहुसंख्य युवकांनी रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करून सहभागी व्हावे, असे आवाहन माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी केले. दुधनीचे माजी नगराध्यक्ष स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे व स्व. मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे यांच्या पुर्णाकृती पुतळा अनावरण व कळसारोहण कार्यक्रम आयोजित बैठकीत म्हेत्रे बोलत होते. ही बैठक अक्कलकोट येथील काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात पार पडली. प्रास्ताविक महेश जानकर यांनी केले.
पुतळा अनावरण व कळसारोहण कार्यक्रमास, रक्तदान शिबिरास मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून काँग्रेस कार्यकर्त्यांनी व तालुक्यातील सर्व म्हेत्रे प्रेमींनी आपली एकजूट दाखवावी असे जिल्हा परिषद सदस्य मल्लिकार्जुन पाटील यांनी सांगितले. स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांचे कार्य तालुक्यात मोठे होते. ते अनेक अडचणींना धावून जात असत त्यांची प्रथम पुण्यतिथी आहे. त्यामुळे हा कार्यक्रम भव्य होणार आहे, असे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन काटगाव यांनी सांगितले. या कार्यक्रमात कोरोना काळात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या कोरोना योध्याचा सन्मान देखील केला जाणार आहे, ही विशेष बाब आहे, असे सभापती आनंदराव सोनकांबळे यांनी सांगितले.
यावेळी तालुका युवक काँग्रेसचे बाबासाहेब पाटील,माजी नगरसेवक रईस टिनवाला,शहर युवक अध्यक्ष मुबारक कोरबु, माजी उपसभापती सिद्धार्थ गायकवाड, कुरनूरचे सरपंच व्यंकट मोरे, राम अरवत, डॉ.उदय म्हेत्रे, नगरसेवक सद्दाम शेरीकर, विकास मोरे, सातलींग गुंडरगी, सुनीता हडलगी, मंगल पाटील, सिद्धाराम भंडारकवठे, शिवशरण इचके , सुधीर सोनकवडे, सायबु गायकवाड, प्रवीण शटगार, महेश वानकर, काशिनाथ गोळळे, सरफराज शेख, शबाब शेख, विश्वनाथ हडलगी, नबी शेख, मोहन देडे, बबन पवार, बाजीराव खरात, राजकुमार लकाबशेट्टी, रोहिदास राठोड, महादेव चुंगी, फारूक बबरची, शिवराज पोमाजी, धर्मा गुंजले, यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.