दक्षिण सोलापूर – तिल्हेहाळ येथील शावरप्पा पांढरे व युवराज रजपूत यांच्या जी-९ जातीच्या केळी एक्सपोर्टसाठी परदेशी मार्केटमध्ये जात आहे. पांढरे यांनी दोन एकर पाण्याची निचरा होणाऱ्या जमीनीमध्ये पाच बाय सहा आंतर ठेवून लिंबोळी पेंड व थिमेंट आदी, खतांचा वापर करून सुमारे २६५० रोपांची लागवड केली आहे. कोरे बायोटेक कुंभार यांच्या मार्गदर्शन लाभले. तीन महिन्यांनंतर गावखत व जिवाणू खतांचा वापर करण्यात आला.
सातव्या महिन्यात केळीचे झाड व्ह्यायला सूरुवात झाली. दहाव्या महिन्यात पूर्णपणे माल तयार झाला आहे.आजपर्यंत १ लाख ३० हजार खर्च आला आहे. सध्या केळीला मार्केटमध्ये १० रुपये ते १३ रुपये प्रती किलो दर मिळत आहे.
टेभूर्णी येथील व्यापाऱ्यांनी १३ रुपये दराने शेतकऱ्यांच्या बांधावरून माल खरेदी करून एक्सपोर्ट करण्यासाठी घेतला. पांढरे यांनी दोन एकरात ४० टन केळीचे उत्पादन घेतले असून आणखी २५ टन उत्पादनाचा आंदाज व्यक्त केला आहे.
युवराज रजपूत यांनी कोरे बायोटेक ,कुंभारी यांच्या मार्गदर्शनाखाली ३० गुंटे (पाऊण एकर ) जमिनीत पाच बाय सहा आंतर ठेऊन १००० रोपांची लागवड केली आहे, यामध्ये लागवड करतेवेळी शेणखत, थिमेंट,लिंबोळी खतांचा वापर करण्यात आला. १महिन्यानंतर शेणखत, डीएपी,२०, २०, ० आदी मिश्र खतांचा डोस देण्यात आला.
तीन महिन्यांनंतर डीएपी,18,18,10,युरिया शेणखत आदी मिश्र खतांचा दिला. दहाव्या महिन्यात केळीचे उत्पादन सुरु झाले असून जागेवर १३ रुपये प्रति.किलो दर मिळाला आहे. परदेशाला माल एक्पोर्ट केला जात आहे. रजपूत यांनी ३० गुंट्यात १० टन केळीचे उत्पादन घेतले आहे. आणखी १० टन उत्पादनाची आपेक्षा आहे.
जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी इतर पिकांच्या मागे न लागता आपल्या शेतामध्ये उत्तम प्रकारे पाण्याचा निचरा होणार्या जमिनीत कमीत कमी पाण्यात व कमी खर्चामध्ये, केळी हे दहा महिन्याच्या कालावधीत हमखास उत्पन व नफा मिळवून देणारे एकमेव पीक आहे,शेतकऱ्यांनी केळी लागवड करावी असे आवाहन पांढरे व रजपूत यांनी केले आहे. आवघ्या दहा महिन्यात परदेशी मार्केटमध्ये केळी एक्सपोर्ट केल्याबद्दल सर्व स्तरातून पांढरे व रजपूत यांचे कौतुक होत आहे.
★ केळी एक्सपोर्टसाठी प्रयत्न करा
सर्व शेतकरी बांधवांनी इतर पिकांच्या पाठिमागे न लागता कळीचे पीक जरूर घ्यावे. पाणी व वायफट खर्च न करता, ठिबक सिंचनाव्दारे कमीत कमी पाण्यात व कमी खर्चात,चांगले उत्पादन व नफा मिळवून देणारे केळी एकमेव पिक आहे.पाण्याचा निचरा होणार्या जमिनीत केळी लागवड करावी. लोकल मार्केटचा विचार न करता ,पाच महिने योग्य प्रकारे खतांचे नियमित डोस देऊन केळी परदेशी मार्केटसाठी एक्सपोर्ट करण्यासाठी प्रयत्न करावा – शावरप्पा पांढरे, तिल्हेहाळ