ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये शूरवीर सैनिक, शेतकरी आणि पोलिस  अधिका-यांचा सन्मान

अक्कलकोट –  जय भारतमाता सेवा समितीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदगुरु श्री ओम हवा मल्लिनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात शूरवीर आजी – माजी सैनिक, शेतकरी आणि पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान सोहळा बरोबरच धर्मसभा, देशभक्तीपर गीत व नाटक मोठ्या उत्साहात पार पडला. येथील प्रियदर्शनी मंगल कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त हा आगळावेगळा कार्यक्रम अक्कलकोटकरांना  लक्षवेधक ठरला. श्री हवा मल्लिनाथ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.”बोलो भारत माता की जय, हवा  मल्लिनाथ महाराज की जय” च्या जयघोषाने सारे वातावरण मंगलमय झाले होते.

सदगुरु हवा मल्लिनाथ महाराज यांनी देशच माझे घर, देशच माझे परिवार आहे. तसेच “देश पहिला नंतर सर्व काही” या प्रमुख उद्देशाने जय भारतमाता सेवा समितीची निर्मिती केली असून शिवभक्तांनी धावपळीच्या जीवनात प्रपंच करताना देशभक्ती मार्गाकडे वळावे. यासाठी तेलंगण, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र यासह अनेक राज्यासह संपूर्ण देशभरात सुमारे साडेपाच हजारोहून अधिक शाखा स्थापित केली असल्याचे सांगितले. प्रारंभी दीपप्रज्वलन व प्रतिमा पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. महाराजांचे  स्वागत पञकार विरूपाक्ष कुंभार व विजयालक्ष्मी कुंभार या दांपत्यांनी केले. प्रास्ताविक भाषण ज्येष्ठ पञकार बाबासाहेब निंबाळकर यांनी केले.

यावेळी आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी नगराध्यक्ष  बसलिंगप्पा खेडगी, जि. प. सदस्य आनंद तानवडे,  महिबुब मुल्ला, उद्योगपती सुखदेव भुसे- पाटील, बापु वाडकर, मल्लम्मा पसारे, नगरसेविका सारिका सुभाष पुजारी, डाॕ. गणपतराव कलशेट्टी, सुनिल बंडगर, अविनाश मडिखांबे, एस.एस.बिराजदार, प्रकाश करकी, लक्ष्मण कोकरे, रेवणसिद्ध पाटील, स्वामीनाथ हिप्परगी, गिरीश तंबाखे, राजशेखर कलबुर्गी, अप्पु उण्णद, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, प्रदीप काळे, सिद्धय्या मठपती, चंद्रशेखर मडिखांबे, अनिल पाटील, सोमनाथ  साखरे, प्रदीप पाटील, डाॕ.मृत्युंजय निलंगे, अप्पाशा मलगोंडा, रामण्णा कोळी,गंगाधर म्हेत्रे, वे. बसवराज शास्ञी आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

समितीचे प्रमुख पञकार बसवराज बिराजदार, भीमराया सुतार, राजेश जगताप, शरणबसप्पा कलशेट्टी, विकास बिराजदार आदींनी परिश्रम घेतले. हा कार्यक्रम सुमारे चार तास चाललेला होता. दिवसभर सुमारे तीन हजारहून अधिक भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. सुत्रसंचालन विद्याधर गुरव, वेदमूर्ती धानय्या स्वामी, अभिजीत लोके यांनी केले. आभार पञकार योगेश कबाडे यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!