---Advertisement---

आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित संजीवकुमार हत्तरके यांचा सत्कार

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट ता १२: अक्कलकोट तालुक्यातील श्री महादेव विद्या मंदिर प्रशालेचे इंग्रजी विषयाचे जेष्ठ शिक्षक संजीवकुमार हत्तरके यांना कै. प्रा आप्पासाहेब खुबा व श्री बसवेश्वर प्रशाला काझीकणबस ता. अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

त्या प्रिथ्यर्थ श्री महादेव विद्या मंदिर प्रशाला बोरगावच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक प्रभाकर बंदीछोडे तर प्रमुख पाहुणे पांडुरंग पवार हे होते.

यावेळी सत्काराला उत्तर देताना हत्तरके म्हणाले की, इंग्रजी भाषा ही साधी व सरळ आहे.आकलन व समीक्षा करून ते आत्मसात करू शकतो. इंग्रजी भाषेकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिल्यास समजून घेताना व अध्ययन करताना अडचणी येणार नाहीत. शब्दसाठा व व्याकरण याचे सूक्ष्म रसग्रहण केल्यास इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवू शकतो.

यावेळी रशीद पठाण, शाम देशेट्टी, विजयकुमार चव्हाण,अमोल फुलारी, आनंद सुतके, दरेप्पा बिराजदार काशिनाथ जिरगे यांच्यासह प्रशालेतील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजयकुमार चव्हाण तर आभार आनंद सुतके यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!