अक्कलकोट : गावे तंटामुक्त होण्यासाठी लोक अदालतीची संकल्पना चांगली असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन
अक्कलकोटचे सहदिवाणी व फौजदारी न्यायाधीश आर.एन.शेख यांनी केले.
चपळगाव (ता.अक्कलकोट ) येथे तालुका विधी सेवा समिती आणि वकील संघ,अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोकअदालत कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच उमेश पाटील हे होते.
पुढे बोलताना शेख म्हणाले, अनेक वेळा गाव पातळीवर गैरसमजुतीतुन तंटे निर्माण होतात.लोकअदालतीच्या माध्यमातुन असे तंटे गावस्तरावर निवारण केले पाहिजेत. यासाठी ही संकल्पना आहे. तंटामुक्त गाव योजनेसाठी ही संकल्पना फार मोलाची
ठरत आहे,असेही ते म्हणाले. यावेळी बोलताना सरपंच उमेश पाटील यांनी गावपातळीवर प्रत्येकाने समजून घेऊन वागल्यास तंटे कमी होण्यास मदत होईल आणि जरी असले तरी ते लोकअदालतीच्या माध्यमातून सोडवल्यास आपले गाव तंटामुक्त होईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी जेष्ठ नेते अंबणप्पा भंगे, न्यायाधीश आर.एन.शेख, सरकारी वकील जी. बी. सरवदे, बार असोसिएशनचे अध्यक्ष विजय हार्डीकर,सचिव व्ही.बी.पाटील, तंटामुक्त अध्यक्ष महेश पाटील, उपाध्यक्ष तम्मा गजधाने, सुभाष बावकर, पोलिस पाटील चिदानंद हिरेमठ, वकील दयानंद हिरेमठ,ग्रामसेवक एस.बी.कोळी,परमु वाले आदी उपस्थित होते.
याप्रसंगी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तंट्यांविषयी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक महेश पाटील यांनी केले.यावेळी आरोग्य खात्याचे पर्यवेक्षक दलाल,दिपक लांडगे,स्वप्नील मोरे, आय.के.चौधरी, आर.एस.शिवापूरकर,अशोक कोळी, अॅड.एस.एम.हंद्राळ आदी उपस्थित होते.
सुत्रसंचालन शंभूलिंग अकतनाळ यांनी तर आभार ग्रामसेवक एस.बी. कोळी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रकाश बुगडे,शिरू अचलेरे,विठ्ठल पाटील,पांडू चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.