आज काल खूप जण सत्ता ,संपत्ती ,बडेजावच्या पाठीमागे लागलेली दिसून येतात. या सगळ्यातून सर्वसामान्यांमध्ये मिळून-मिसळून आपुलकीने वागणारे खूप कमी लोक
दिसून येतात. यापैकीच एक नाव म्हणजे चपळगावचे विकासरत्न सरपंच तथा उद्योजक उमेश पाटील हे आहे.
आई सौ. सुमन, वडील कुमारप्पा पाटील यांच्या संस्कारात वाढलेल्या उमेश पाटील यांना लहानपणापासूनच व्यापार उद्योगाची आवड होती.अगदी पदवीचे शिक्षण घेत असतानाच आपले काका कृषी तज्ञ आप्पासाहेब पाटील यांच्या मनीषा कृषी भांडारच्या माध्यमातूनच
त्यांनी १९९७ ला सोलापूर येथे मनीषा ऍग्रो सिंडिकेट या व्यवसायाची गुढी उभारून शुभारंभ केला.अल्पावधीतच स्वतःच्या कार्यकुशलतेनेवरून त्यांनी २००६
मनीषा ऍग्रो सायन्सेसच्या माध्यमातून खते, बी-बियाणे ,औषधे यांची दर्जेदार निर्मिती आपल्या स्वतःच्या कंपनीमध्ये करू लागले. आज या उद्योगात शंभरच्या आसपास अधिकारी व कर्मचारी कामावर आहेत. व्यवसायाची व्याप्ती बघता- बघता महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात ,मध्यप्रदेशापर्यंत विस्तारले आहे. व्यवसायात स्थिरस्थावर होत असताना प्रत्येकाला पुढील व्यवसायाची व्याप्ती व विस्ताराची इच्छा असतेच.यातूनही वेळ काढून त्यांनी आपल्या मूळगावी चपळगावची नाळ अतूट व घट्ट ठेवली आहे.त्यांच्या या प्रयत्नातून गावातील तरुण बेरोजगारांना काम मिळावे म्हणून कंपनीची काही उत्पादने गावातच तयार होऊ लागले. परिसरातील लोकांच्या सेवेसाठी शेतीविषयक ,सामाजिक, आरोग्य, अध्यात्मिक ,आर्थिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने
ते पुढे असतात. चपळगाव परिसरातील लोकांना आधुनिक दर्जेदार शिक्षणाची सोय व्हावी म्हणून रिणाती इंग्लिश मीडियम स्कूलची स्थापना केली. या त्यांच्या
लोकसेवारुपी कार्याला साद घालण्यासाठी गावकर्यांनी त्यांना सरपंच पदावर विराजमान केले.त्यांच्या सामाजिक कार्याला मोठे बंधू स्व. संतोष दादांचा प्रेरणादायी आशीर्वाद आहे.त्यांच्या सरपंचपदाच्या कार्यकाळात अनेक लोकोपयोगी विधायक कार्याची भर आहे. त्यांचा कार्यकाल हा गावाच्या सर्वांगीण विकासाचा आदर्श नमुना आहे.त्यांच्या प्रत्येक कार्याला गावकऱ्यांनी भरभरून साथ दिली आहे. निखळ मैत्रीचा आदर्श म्हणून त्यांच्याकडे त्यांचा मित्रपरिवार पाहत असतो. आपला वर्गमित्र ,गावमित्र हा शेतकरी असो मजुरदार असो अथवा व्यापारी किंवा नोकरी करणारी असो या प्रत्येकाशी ते आपुलकीने वागतात. कुठल्याही प्रकारच्या मोठेपणाचा आव न आणता सर्वांशी स्वतःहून बोलतात. गप्पा गोष्टी ,जुन्या आठवणीने गावच्या आदर्श परंपरेचा अभिमान बाळगणे हा एक त्यांचा चांगला गुण दिसून येतो. सगळ्यांच्या सुख दुःखात मिसळतात. सभा, समारंभ, प्रवास, देवधर्म, व्यापार-उद्योगात आपल्या परीने ते सर्वांना सहकार्य करत असतात.
कोणाचाही कुठल्याही प्रकारे राग, द्वेष न ठेवता सगळ्यांशी आपलेपणा दाखवतात. तरुणांनी व्यसनापासून लांब राहावे,व्यसन करूच नका,जर एखाद्याला असेल तर ते सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न
करतात. व्यायाम ,प्राणायामाने शरीराला सांभाळण्यासाठी प्रसंगी रागाला येऊन सांगतात. मी चारचाकीत येतो, त्याप्रमाणे माझे मित्र सुद्धा फिरावे अशी त्यांची इच्छा सर्वांना सातत्याने बोलून दाखवतात. हाच त्यांचा निखळ मैत्रीचा मोठा आदर्श आहे. व्यवसायात व सार्वजनिक जीवनात बाहेरचे खूप माणसे, अधिकारी, पदाधिकारी भेटत असतात. भेटेल त्याला सर्वांना आपुलकीने बोलून आपले करण्याची कला कौशल्य वाखाणण्यासारखे आहे.त्यांच्याकडे मित्राच्या रुपाने आलेला प्रत्येक जण सन्मित्रच बनतो.मित्रांमध्ये मिळून-मिसळून राहण्यात धन्यता मानतात. त्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन महाराज, कुलदैवत होर्ती सिद्धायप्पा यांची कृपादृष्टी, पूर्वजांची पुण्याई ,पाटील घराण्यात आदर्शरुपी आधार ,सर्व गावकरी व मित्र परिवाराच्या सदिच्छा ,अधिकारी व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य सौ. रोहिणी वहिनीची त्यांना भक्कम साथ आहे.ते नेहमी आपल्या बोलण्यातून बोलून दाखवतात.सौ.रोहिणी वहिनी या उच्चविद्याविभूषित सुसंस्कारित असूनही सर्वांशी मायाने आपुलकीने वागतात,अशा या सन्मित्राचा आज वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांना व त्याच्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो, हीच या निमित्ताने सदिच्छा !
ज्ञानेश्वर कदम (सर) चपळगाव.