उद्योजक उमेश पाटील यांनी उद्योग क्षेत्रात घेतलेली भरारी कौतुकास्पद, चपळगाव ग्रामस्थांच्यावतीने सरपंच पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार
अक्कलकोट, दि.१७ : उद्योजक उमेश पाटील हे चपळगावकरांना लाभलेले उत्तुंग नेतृत्व आहे. ते सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी भूमिकेतून काम करतात. उद्योग क्षेत्रात त्यांनी घेतलेली भरारी कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार अहमदाबाद येथील जी.एस. पी कंपनीचे व्हाईस प्रसिडेंट राजेंद्र लांडगे यांनी केले. चपळगाव (ता.अक्कलकोट) येथे सरपंच तथा उद्योजक उमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
प्रारंभी केक कापून पाटील यांचा चपळगाव ग्रामस्थांच्यावतीने नागरी सत्कार करण्यात आला. पुढे बोलताना लांडगे म्हणाले कि, उमेश पाटील यांनी मनीषा ॲग्रोच्या माध्यमातून केवळ सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर गुजरात ,मध्यप्रदेश यासारख्या राज्यांमध्ये देखील लौकिक मिळवला आहे. १९९६ साली सुरू झालेल्या या मनीषा ॲग्रोचा प्रवास हा विचारात घेण्यासारखा आहे.एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांनी निर्माण केलेला आदर्श नक्कीच प्रेरणादायी आहे, असे ते म्हणाले.
युवा नेते बसवराज बाणेगाव यांनी देखील त्यांच्या नेतृत्व गुणांची प्रशंसा केली. लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत आदराने त्यांचे बोलणे आणि त्यांच्याशी आपुलकीने वागणे आणि कुणाविषयी ही वाईट भावना मनामध्ये न ठेवणे हे त्यांचे सद्गुण आहेत. त्यांचा आदर्श खरोखर घेण्यासारखा आहे, असे त्यांनी सांगितले.
सिद्धाराम भंडारकवठे यांनीही आपल्या वर्गमित्राविषयी भावना व्यक्त करताना उमेश पाटील एक सरळ स्वभावाचे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे आमचे आणि पाटील परिवाराचे नाते घट्ट झाले आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी ज्ञानेश्वर कदम अंबणप्पा भंगे, ब.रे.मठदेवरू, सिद्धाराम डोळळे यांनी मनोगत व्यक्त केले.
सत्काराला उत्तर देताना,सरपंच उमेश पाटील म्हणाले की, गावकऱ्यांचे ऋण मी या आयुष्यात तरी कधीही विसरणार नाही. त्यांच्या उतराईतून मी नक्की काम करेन. कायम त्यांच्याशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करेन. तसेच या भागात विकासाची गंगा या माध्यमातून आपण आणत राहू,अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी जय भवानी तरुण मंडळ, पी.जे ग्रुप बावकरवाडी, गजधाने परिवार, महात्मा फुले तरुण मंडळ, बसवेश्वर तरुण मंडळ, श्री महालक्ष्मी तरुण मंडळ, मल्लिकार्जुन तरुण मंडळ ,जय भवानी तरुण मंडळ, मुस्लिम समाज, साई पाटील मित्र परिवार, चपळगाव संस्थान मठ, तंटामुक्त अध्यक्ष, रिणाती इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यावतीने सत्कार सोहळा पार पडला.
व्यासपीठावर तंटामुक्त अध्यक्ष महेश पाटील,जेष्ठ नेते सिद्धाराम भंडारकवठे, युवा नेते बसवराज बाणेगाव, अंबणप्पा भंगे, अभिजित पाटील, रियाज पटेल,बसवराज मठपती, परमेश्वर वाले, श्रावण गजधाने, कुमारप्पा पाटील, सुमन पाटील ,रोहिणी पाटील, पांडुरंग चव्हाण, मनोज इंगुले, राजशेखर विजापूरे, सुभाष बिराजदार राजा कोळी, विलास कांबळे, महिबूब तांबोळी, सुरेश सुरवसे, प्रदीप वाले स्वामीनाथ जाधव, सायबणा म्हमाणे, सुभाष बावकर आदी मान्यवरांची
उपस्थिती होती.
या कार्यक्रमात गोरगरीब गरजू महिलांना साड्या वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिगंबर जगताप यांनी केले. सूत्रसंचालन शंभूलिंग अकतनाळ यांनी केले. यावेळी चपळगाव व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिवसभरात सोलापूर येथे देखील विविध संस्था आणि मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून व भ्रमणध्वनीवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.तसेच विविध संस्थांच्यावतीने सत्कार देखील करण्यात आला.
लोकसेवेला प्राधान्य देऊ
आतापर्यंत गावासाठी आणि परिसरासाठी मी चांगलेच करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चपळगावकरांनी इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्यावर प्रेम केले आहे ते कधी विसरू शकणार नाही.यापुढच्या काळात लोकसेवेला प्राधान्य देऊ – उमेश पाटील,सरपंच