ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशाच्या संरक्षण विभागासाठी युवकांनी तयार रहावे;शास्त्रज्ञ गुरव यांचा समाजातर्फे सत्कार

अक्कलकोट दि.१९ : देशाच्या संरक्षण विभागात योगदान देण्यासाठी युवकांनी तयार रहावे,असे आवाहन करून डॉ.ए .पी. जे अब्दुल कलाम यांचे अधुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझा प्रयत्न असणार असल्याचे मत युवा शास्त्रज्ञ भिमाशंकर गुरव यांनी व्यक्त केले.  शास्त्रज्ञ गुरव याना नुकतेच भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाकडून भारत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते “यंग सायंटिस्ट ऑफ दि ईयर” पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.  त्यानिमित्त अक्कलकोट येथे गुरव समाजाकडून आयोजित नागरी सत्कार समारंभाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गुरव समाज मंडळाचे अध्यक्ष शिवानंद फुलारी होते.

व्यासपीठावर ह. भ. प. काशिनाथ गुरव महाराज, उद्योगपती संजय पाटील, मोहन यादव, मल्लिनाथ पुजारी, स्वामीराव गुरव उपस्थित होते. प्रारंभी भिमाशंकर गुरव यांना समाज मंडळाकडून सन्मान पत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी नूतन गुरव समाज संघटक म्हणून पाच जणांना निवडीचे पत्र, गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, रमेश फुलारी, बसवराज फुलारी, शिवपुत्र गुरव, स्वामीनाथ गुरव, ज्ञानेश्वर गुरव, बसवराज गुरव, शिवानंद पुजारी, प्रकाश गुरव, उदय पाटील, काशिनाथ फुलारी, लक्ष्मीपुत्र पाटील, गुंडप्पा नागरसे, बापूराव पाटील, सुरेश बिराजदार, सुरेश पाटील, प्रभाकर गुरव, चंद्रकांत गुरव, ज्ञानेश्वर फुलारी, राजू गुरव, कृषी अधिकारी चंद्रकांत गुरव, यांच्यासह रोहिणी फुलारी, प्रभावती नडगिरी, आश्विनी गुरव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन विद्याधर गुरव यांनी केले तर शरणप्पा फुलारी यांनी आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!