सोलापूर : उपेक्षित, पद दलित अशा समाजातील शेवटच्या घटकांना केंद्रस्थानी मानून राष्ट्रधर्म शिकवणारा महानायक श्रीकृष्णच होता. असे प्रतिपादन अमृतवक्ते विवेकजी घळसासी यांनी केले. समर्थ सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाभारत या विषयावर तीन दिवस वाग्यज्ञाचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये तिसऱ्या दिवशी महानायक श्रीकृष्ण यावर ते बोलून या वाग्यज्ञाचा समारोप त्यांनी केला.
सर्वात श्रेष्ठ धर्म हा राष्ट्रधर्म असल्याचे आपल्या संपूर्ण आयुष्यात महानायक श्रीकृष्णाने दाखवून दिले आहे. जीवनात समतोल कसा राखला पाहिजे याचे उत्तम उदाहरण म्हणजे महानायक श्रीकृष्ण होय. राष्ट्राच्या हिताचा प्रत्येक व्यवहार आपल्या जीवनात असला की राष्ट्रधर्म प्रामाणिकपणे पाळला जातो. श्रीकृष्णाच्या जन्मापासूनच त्यांच्या अंगी राष्ट्रधर्म होता म्हणूनच ते महानायक झाले. समाजातील उपेक्षित पददलितांच्या मनात जागृती आणून त्यांना सन्मान आणि आत्मगौरवासाठी सज्ज केले म्हणूनच ते महानायक झाले.
समाजाला उभं करण्याचे महत्वाचे काम महानायक श्रीकृष्णाने केले. शत्रुवरही प्रेम केले पाहिजे हे श्रीकृष्णाने सांगितले. प्रेमाचा पर्यायवाची शब्द श्रीकृष्ण आहे. मनात छल कपट नसला की आनंदचा वर्षाव होतो हेही श्रीकृष्णाने आपल्या कर्तुत्वाने सिध्द केले आहे. असेही विवेकजी घळसासी यांनी आपल्या अमृतवाणीतून सांगितले. गेल्या तीन दिवसापासून समर्थ सहकारी बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित महाभारत या वाग्यज्ञातून केवळ कथा सांगणे हा उद्देश नव्हता तर वर्तमान काळातील घडामोडी महाभारतकालीन प्रसंगाशी कशा सुसंगत आहेत हे सांगणे हेतु या तीन दिवसात होता असेही अमृतवक्ते विवेकजी घळसासी यांनी सांगितले.
तिसऱ्या दिवसाच्या वाग्यज्ञाचा शुभारंभ बँकेचे जुने खातेदार इंडियन मॉडेल स्कुलचे अमोल जोशी, सायली जोशी आणि बँकेच्या प्रारंभीच्या काळातील कर्मचारी भालचंद्र सोनकवडे, प्रसाद वेल्हाळ, श्रीकांत रंगदाळ, आनंद एकबोटे, उमेश कालेकर, संतोष कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि समर्थ रामदासाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर बँकेच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे आणि अमृतवक्ते विवेकजी घळसासी यांचा शाल पुष्पहार देवून स्वागत करण्यात आले.
यावेळी बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे, उपाध्यक्ष राजन जांबोटकर, संचालक श्रीनिवास कुमठेकर, राजेश पटवर्धन, अॅड श्रीकृष्ण कालेकर, पंचागकर्ते मोहन दाते, रमेश कोल्हापुरे, प्रशांत बडवे आदी उपस्थित होते. या तीन दिवसाच्या वाग्यज्ञाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रशांत बडवे यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेकांनी मोठा हातभार लावला.
समर्थ सहकारी बँकेच्या रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित वाग्यज्ञाच्या तिसऱ्या दिवशीचा शुभारंभ इंडियन मॉडेल स्कुलचे अमोल जोशी, सायली जोशी आणि बँकेच्या प्रारंभीच्या काळातील कर्मचारी भालचंद्र सोनकवडे, प्रसाद वेल्हाळ, श्रीकांत रंगदाळ, आनंद एकबोटे, उमेश कालेकर, संतोष कुलकर्णी यांच्यो दीप प्रज्वलन आणि समर्थ रामदासाच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. यावेळी बँकेचे अध्यक्ष दिलीप अत्रे, उपाध्यक्ष राजन जांबोटकर, संचालक श्रीनिवास कुमठेकर, राजेश पटवर्धन, अॅड श्रीकृष्ण कालेकर, पंचांगकर्ते मोहन दाते, रमेश कोल्हापुरे, प्रशांत बडवे आदी.