जयहिंद शुगर्सची वाटचाल शेतकऱ्यांच्या हितासाठी – खासदार डाॅ.जयसिध्देश्वर महास्वामी ;सातव्या गळीत हंगामाचा थाटात शुभारंभ
अक्कलकोट : जयहिंद शुगर्सच्या स्थापनेपासून प्रत्येक घटनेचा मी साक्षीदार बनलो आहे. या कारखान्याने आजतागायत शेतकऱ्यांसह समाजाच्या उन्नतीसाठी विधायक कार्य राबविले आहेत. या कारखान्याची वाटचाल ही शेतकऱ्यांच्या हितासाठीच असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले.आचेगाव येथील जयहिंद शुगर्सच्या सातव्या गाळप हंगामाच्या मोळी पूजन प्रसंगी ते बोलत होते.
कारखाना प्रांगणात विधिवत सर्व पूजा करून मोळी पूजन तसेच ऊस आणलेल्या पहिल्या दोन वाहनांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून यावर्षीच्या गळीत हंगामास प्रारंभ करण्यात आला. प्रास्ताविकात गणेश माने देशमुख म्हणाले की, या वेळचा
हंगाम सर्वात मोठा आहे आणि कारखान्याची कार्यक्षमता सुद्धा वाढलेली आहे.शेतकऱ्यांनी संयम बाळगावा,यावेळी उसदेखील खूप उपलब्ध असूनही प्रत्येक फडाची जबाबदारी जयहिंदची आहे.
सर्व ऊस गाळप करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येणार असून कारखाना सचोटीने चालवून सर्वांनी कारखान्यावर ठेवलेला विश्वास सार्थ ठरवू. या गळीत हंगाम शुभारंभास पंचक्रीशोतील ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी जयहिंद शुगर्सचे चेअरमन गणेश माने देशमुख, कार्यकारी निर्देशक बब्रुवान माने देशमुख,व्हाइस चेअरमन विक्रमसिंह पाटील, मुख्य शेती अधिकारी राजेंद्र जेऊरे, कार्यकारी संचालक मोहन पिसे, हुमनाबाद मठाचे शिवकुमार स्वामी, पवार,अमोल जगताप,ज्ञानेश्वर बळवंतराव,हॉटेल शनायाज् चे संचालक रविप्रकाश मेंगर, आर. गोकुळ, मोहन चिंतलवार ,केदारनाथ बावी,शंकर पाटील,विलास बावी,प्रभूलिंग सर्वगोड,तानाजी बनसरे,आदींची
उपस्थिती होती. वेदोपचार वेदमुर्ती
बसवराज शास्त्री हिरेमठ यांनी केले.
एफआरपी प्रमाणे ऊसबिल वेळेवर देणार
आजतागायत शेतकऱ्यांच्या भरघोस सहकार्यावर जयहिंद शुगर्सची योग्य दिशेने वाटचाल सुरु आहे.ठरलेल्या एफआरपी प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर यावर्षी वेळेवर ऊस बिले जमा करणार आहोत. शेतकऱ्यांनी परिपक्व ऊसाचा पूरवठा कारखान्यास करावा,यामुळे कारखान्याची रिकव्हरी सुधारेल – गणेश माने देशमुख,चेअरमन जयहिंद शुगर्स