---Advertisement---

युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या रविवारी सोलापुरात मुलाखती 

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर – युवती सेनेच्या सोलापूर शहर,शहर मध्य, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर व अक्कलकोट तालुक्यासाठी युवती पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात येणार असून त्यासाठी रविवार २४ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता शासकीय विश्रामगृहात युवतींच्या मुलाखती होणार आहेत.

युवा सेनेच्या राज्य सचिव दुर्गाताई शिंदे,युवा सेनेचे राज्य विस्तारक तथा सहसचिव विपुल पिंगळे,युवती सेनेच्या राज्य सहसचिव अश्विनी पवार,शर्मिला येवले या युवतींसाठी पदाधिकारी निवडीच्या मुलाखती घेणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ११ वाजता पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात ग्रामीण भागातील सांगोला, माळशिरस, माढा,करमाळा,पंढरपूर व मंगळवेढा या तालुक्यातील  युवतींच्या मुलाखती पार पडणार आहेत.

युवा सेनेचे प्रमुख तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने युवा सेनेचे राज्य सचिव वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलाखती होणार आहेत. राज्यात युवा सेनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून युवकांचे प्रश्न सोडविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता युवती सेनासुद्धा कार्यरत झाली आहे. राज्यात अनेक जिल्ह्यात युवती सेनेसाठी मुलाखती झाल्या असून आता सोलापुरात यासाठी रविवारी मुलाखती होणार आहेत.
या मुलाखतींसाठी येताना इच्छुक युवतींनी सोबत आपल्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा व छायाचित्र आणावे असे आवाहन युवा सेनेचे शहर युवाधिकारी विठ्ठल वानकर यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!