आधी आपण आपली पात्रता तपासावी..! विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी साधला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या “या” मंत्र्यावर निषाणा
अक्कलकोट : सामाजीक व न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बारामती येथे पाडव्याच्या दिवशी भाजपला गाडण्याची भाषा केली होती. त्या विधानाचा धागा पकडत विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणविस यांनी सामाजीक व न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. ते अक्कलकोट येथे बोलत होते. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते अक्कलकोट शहरातील विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आले होते. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या चुकांवर बोट ठेवत केंद्र सरकारच्या कामाचे कौतुक केले.
विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा, अक्कलकोट https://t.co/lOINva4lQP
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 8, 2021
“अरे वेड्या, भारतीय जनता पार्टी मुंबईच्या मातीतून उभी राहीली आहे. २ वरुन ३०२ वर गेलेली हा पार्टी आहे. चार-सहा खासदार असलेल्या पक्षाच्या नेत्याने आम्हाला सांगण्याचं कारण नाहीये. आम्हाला मातीत गाड़णारे स्वतः गाडले गेले, आम्हाला गाडू शकले नाही. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या चाललेल्या आहेत, एसटी संप सुरू आहे आणि हे नाच गाणं करण्यात मग्न आहेत, हे आम्हाला सांगून राहिले मातीत गाडून टाकू, भाजपचा कार्यकर्ता हा देखील तुम्हाला पुरेसा आहे, अशा वल्गना करू नका, सामान्य माणसाच्या हिताचे काय काम आपण करू शकतं हा प्रयत्न तुम्ही करा”, असं फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्रात सध्या असलेले सरकार हालत नाही, डुलत नाही अन् चालतही नाही. नेमके काय करते तर प्रत्येकांकडून वेगवेगळ्या माध्यमातून फक्त वसुली करण्याचे काम सुरू आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. शेतकरी, शेतमजूर व दलित बांधव या सर्वांच्या संकटात दिवसेंदिवस वाढ होत आहे. हे आम्ही पाहत बसणार नाही, तर त्यांच्यासाठी अखंड संघर्ष करीत राहू असा विचारही फडणवीस यांनी मांडला.