ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना “का” लिहिले पत्र? वाचा सविस्तर

मुंबई : माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिले आहेत. त्याला कारणही तसंच आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीवाला धोका असून त्यांना सरकारने संरक्षण द्यावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक संजय पांडे यांना देखील पत्र पाठवले आहे. गोपीचंद पडळकर यांच्या जीवाच काही बरं वाईट झाल्यास ही राज्य सरकारची जवाबदारी असेल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

बहुजनांच्या बाजूने उभं राहिल्यामुळे यातून दुखावलेले लोक गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्ला करत आहेत. लोकशाहीत विरोधकांचा आवाज हिंसेने दाबणे ही महाराष्ट्रची संस्कृती नाही. विरोधक असो वा सत्ताधारी ज्याच्या जीवाला धोका त्याला संरक्षण दिला पाहिजे म्हणूनच विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांना विशेष सुरक्षा द्यावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर सांगली आणि सोलापूरात झालेल्या हल्ल्याचा पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी केल्याचे समजते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!