---Advertisement---

शेतकऱ्यांनो सावधान…! “या” तारखेच्या आत शेतीच्या कामे उरकून घ्या, कुठल्या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आले? तर वाचा सविस्तर..!

Follow Us:
---Advertisement---

पुणे : अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. अंदमानच्या समुद्रात मागील आठवड्यात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर झाला आहे. राज्यात आता काही ठिकाणी पुन्हा पाऊस होत आहे. हवामानात बदल झाल्याने पाऊस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

राज्यात सध्या अनेक ठिकाणी ढगाळ हवामान आहे. त्यामुळे थंडी जवळपास गायब झाली आहे. काही जिल्ह्यात पाऊसही होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबई-ठाणे परिसरात एक ते दोन दिवस पाऊस होईल असा अंदाज आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोकणातील काही जिल्ह्यात पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत सुद्धा 5 दिवस पाऊस होईल, अशी शक्यता आहे. नंदूरबार, धुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी पाऊस होईल. मराठवाड्यातील बीड, नांदेड, लातूर, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

18 नोव्हेंबर रोजी ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, नाशिक, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.19 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

20 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नंदुरबार, नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच 21 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, नगर, नाशिक, सोलापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!