मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह कुठे आहेत? अशी चर्चा सुरु होती. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चंदीगडमध्ये होते. त्यांच्या विरोधात जे गुन्हे दाखल झालेत, त्याच्या तपासामध्ये ते सहकार्य करतील. स्वत: परमबीर सिंह यांनी ही माहिती दिली.
गेल्या काही महिन्यांपासून फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. “सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, तपासात सहकार्य करण्यासाठी आलो आहे. मला जे काही म्हणायचय ते कोर्टात म्हणेन” असे परमबीर सिंह यांनी सांगितले.
मुंबई आणि ठाण्यात परमबीर सिंह यांच्याविरोधात एकूण पाच गुन्हे दाखल झाले आहेत. परमबीर सिंह कुठे भारताबाहेर गेले नसून, ते देशातच आहेत अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टात दिली होती. ४८ तासात सीबीआयसमोर हजर होण्यास तयार आहेत असेही त्यांनी सुप्रीम कोर्टात सांगितले होते.