---Advertisement---

तर राजकीय संन्यास.. शहाजीबापू पाटलांचं मोठं विधान

By team
On: November 28, 2024 7:40 PM
Follow Us:
---Advertisement---

सांगोला, वृत्तसंस्था 

विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळाले. मात्र सांगोला विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार शहाजी बापू पाटील यांचा पराभव झाला आहे. शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेले व काय झाडी, काय डोंगार या वक्तव्याने प्रसिद्ध झालेले शहाजीबापू पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख 25 हजार 384 मतांनी विजयी झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांना पुन्हा उमेदवारी सांगोला विधानसभा मतदारसंघात पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे दीपक साळुंखे आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते बाबासाहेब देशमुख रिंगणात उतरले होते. अखेर येथून शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा विजय झाला आहे. पंढरपूर परिसरात या पराभवाचे चिंतन आणि मंथन करण्यात येत आहे. यावेळी एका ठिकाणी जनतेशी संवाद साधताना त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत सांगोला तालुक्यातील जनतेच्या विकासासाठी काम करत राहणार असल्याचे आश्वासन दिले.

निवडणूकीत जरी पडलो असलो तरी एक वर्षाच्या आत सांगोल्याच्या 14 गावतील शेतात पाणी नाही आले तर राजकीय संन्यास घेईल, असे मोठे विधान शहाजी बापू पाटील यांनी केले आहे. पराभव झाल्यानंतर सांगोला येथे शहाजीबापू पाटील यांनी चिंतन बैठकीचे आयोजन केले होते.  ही निवडणूक भावनिक मुद्यावर गेली होती, दोन वर्षात 5 हजार कोटीचा विकास निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. दोन वर्षात कोणी काम केली हे सांगोला तालुक्याला माहित आहे असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी दीपक आबा यांना आणि देशमुख यांना खडेबोल सुनावले. सूडाचे राजकारण मी केले नाही करत नाही…शहाजीबापू निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर खचून जाणार नेता नाही. एकनाथ शिंदे, फडणवीस साहेबांकडून असं पद घेऊन येतो, असे ते म्हणाले. यामुळे शहाजीबापूंना पराभवानंतर पण मोठे पद मिळणार आहे, याची चर्चा होत आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!