ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शक्ती मिल बलात्कार प्रकरण: मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलली

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयानं शक्ती मिल बलात्कार प्रकरणी निकाल दिला असून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या पाच पैकी तीन आरोपींची फाशी रद्द करण्यात आली आहे. न्यायालयाकडून विजय जाधव, कासीम बंगाली, सलीम अन्सारी या आरोपींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रूपांतर केलं आहे.

२२ ऑगस्ट २०१३ रोजी मुंबईतील महालक्ष्मी भागातील शक्ती मिल परिसरात संध्याकाळी एका महिला फोटोग्राफरवर सामूहिक बलात्कार झाला होता. पीडित महिला आपल्या सहकाऱ्यासोबत कामानिमित्त फोटोग्राफी करण्यासाठी तेथे गेली होती. त्यावेळी पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला होता. विशेष म्हणजे अन्य एका १९ वर्षीय तरुणीनेही शक्ती मिल परिसरातच आपल्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोप केला होता.

या प्रकरणातील आरोपीदेखील तेच होते. मुंबई सत्र न्यायालयाने यातील आरोपी विजय जाधव, सलीम अन्सारी, सिराज खान, कासिम बंगाली आणि एका अल्पवयीन मुलाला शिक्षा सुनावली होती. सिराज खानला जन्मठेप तर इतर तिघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. तर अल्पवयीन मुलाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले होते.

शक्तीमिल बलात्कार प्रकरणात एकूण पाच आरोपी होते. यात विजय जाधव, सलीम अन्सारी, सिराज खान, कासिम बंगाली आणि एका अल्पवयीन मुलाचा समावेश होता. यातील सिराज खानला मुंबई सत्र न्यायालयाने आधीच जन्मठेप दिली होती. अल्पवयीन आरोपीला बालसुधार गृहात पाठण्यात आले होते. तर उर्वरीत विजय जाधव, सलीम अन्सारी आणि कासिम बंगाली यांनी सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात हायकोर्टात आव्हान दिले होते. या तिघांनाही आज हायकोर्टाने फाशीची शिक्षा रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!