अक्कलकोट : सोलापूर विधान परिषदेच्या रद्द झालेल्या निवडणुकीबाबतची सुनावणी आता येत्या सोमवारी दि.६ डिसेंबर रोजी होणार आहे.१ डिसेंबर रोजी सुनावणी होणार होती परंतु ती सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली आहे, अशी माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अशपाक बळोरगी यांनी दिली.
नुकत्याच जाहीर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सोलापूरची जागा वगळण्यात आली होती.त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात केस देखील दाखल करण्यात आली होती परंतु ती फेटाळल्याने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली आहे. या बाबत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे राजकीय नेते मंडळींचे लक्ष लागले आहे.
याबाबत बळोरगी म्हणाले,निवडणूक आयोगाला सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून चुकीची माहिती पाठविण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थांच्या संस्था कार्यरत असणाऱ्या मतदारांची संख्या ही ८२.८२ टक्के आहे.पंचायत समितीचे सभापती हे मतदार आहेत. मतदार यादीत त्यांचे नाव समाविष्ट आहे.त्यामुळे एकूण कार्यरत संस्थेची बेरीज केली असता ९३ टक्के पेक्षा जास्त आहे आजही या दाव्यावर आम्ही ठाम आहोत,असे बळोरगी यांनी संचारशी बोलताना सांगितले.