---Advertisement---

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार सहप्रचारकपदी सरचिटणीस लतीफभाई तांबोळी यांची निवड

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२ : पश्चिम महाराष्ट्रातील स्टार सह प्रचारकपदी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय सरचिटणीस लतीफ तांबोळी यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे त्यांचे अभिनंदन होत आहे.

निवडणूक आयोगाने राज्यात जाहीर केलेल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी अधिकृतरित्या जाहीर केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादी समवेत ओबीसी पदाधिकारी यांची सह प्रचारक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लतीफ तांबोळी हे मूळचे मंगळवेढ्याचे असून गेल्या अनेक वर्षापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक आहेत आणि जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बांधणीत त्यांचा मोठा वाटा आहे.

आगामी निवडणुकीत देखील राष्ट्रवादीचे विचार तळागाळापर्यंत पोचवून निवडणुकीत यश मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी निवडीनंतर बोलताना व्यक्त केला. जिल्हा अध्यक्ष बळीराम साठे, कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांनी निवडीबद्दल अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!