ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोना काळात लोकमंगल पतसंस्था नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे, अक्कलकोट येथे स्नेह संवाद मेळावा उत्साहात

अक्कलकोट : कोरोनाच्या काळात लोकमंगल पतसंस्थेच्या माध्यमातून व्यावसायिक लोकांना कर्ज उपलब्ध करून त्यांना आधार देण्याचे काम केले आहे.तळागाळातील सर्व व्यक्ती पर्यंत लोकमंगल पतसंस्था पोहोचली असून लोकांनी देखील पतसंस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे,असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था अक्कलकोट शाखेच्यावतीने आयोजित स्नेह संवाद मेळाव्यात ते बोलत होते. प्रारंभी आमदार सचिन कल्यांणशेट्टी, भाजप तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.  लोकमंगल शाखा अक्कलकोटचे नवनियुक्त सल्लागार प्रवीण गुलाबाचंद शहा, शिवशरण रेवणसिद्ध जोजन, शिवशरण वाले, सुनीता भागानगरे , मल्लम्मा पसारे, स्वामीराव मोरे, पुंडलीक जोडमुटे, संतोष श्रीमंत पराणे, राजशेखर नागुरे, श्रीशैल चिकमळ, इस्माईल जमादार,डॉ. विक्रम पडवळकर, प्रकाश आळगी, रोहन जिरोळे यांचा सत्कार आमदार कल्याणशेट्टी यांच्या हस्ते संपन्न झाला.

अक्कलकोट तालुक्यातील विशेष प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तीचे सत्कार, सत्कार मूर्ती धानय्या गुरुलिंगय्या कवटगीमठ, (सह शिक्षक मंगरूळे प्रशाला), नागम्मा बझे, (खेळ बांबू उडी) सोहेल नदाफ (धाव पटू ) धरती बनसोडे (कुस्तीपटू), लक्ष्मण कोळी (धाव पटू ), मयूर स्वामी (शास्त्रीय संगीत), सोमशेखर जमशेट्टी ( अक्कलकोट) यांचा सत्कार आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन आमदार सचिन कल्यांणशेट्टी मार्गदर्शन करताना लोकमंगल पतसंस्थैला वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन कौतुक केले.

आमदार सुभाष देशमुख उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन करताना ठेवीदारांच्या ठेवीची सुरक्षातेची हमी दिली. ग्राहक हेच दैवत असून त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन व सूचना करण्यास सांगितले. सर्व सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्र व उपस्थित मान्यवरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक विभागीय अधिकारी बसवराज बिराजदार यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शाखा अधिकारी मंगेश सूर्यवंशी यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!