---Advertisement---

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कुरनूर येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

Follow Us:
---Advertisement---

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट,दि.८:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे हापीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दत्त क्रिकेट संघाने दिली आहे. या स्पर्धेला १२ नोव्हेंबर पासून प्रारंभ होत असून या स्पर्धेमध्ये अनेक पंचक्रोशीतील क्रिकेटप्रेमींनी सहभाग नोंदवावा,असे आवाहन करण्यात
आले आहे. या स्पर्धेचे प्रथम बक्षीस राष्ट्रवादी
काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा.प्रकाश सुरवसे यांच्याकडून ७ हजार ५१ ,द्वितीय बक्षीस अक्कलकोट शहर उपाध्यक्ष स्वामी चौगुले ५ हजार ५१ तर तृतीय बक्षीस राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे ३ हजार ५१ यांच्याकडून ठेवण्यात आले असल्याची माहिती संयोजकानीं दिली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना २० नोव्हेंबर रोजी खेळवण्यात येईल. इच्छुक संघाने ९१४५१०९४१२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!