हत्तरसंग कुडल येथे दिव्य काशी भव्य काशी कार्यक्रम, दक्षिण तालुका पर्यटनामध्ये प्रथम क्रमांकावर आणू : आ. सुभाष देशमुख
सोलापूर : दक्षिण तालुक्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत. याची माहिती जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातील लोकांना व्हावी यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तालुक्यातील असेलेल मंदिर, मठ, आश्रमाचे महात्म्याची पुस्तिका करून केंद्राकडे देत हा तालुका धार्मिक पर्यटनात प्रथम क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन आ. सुभाष देशमुख यांनी दिले.
दिव्य काशी भव्य काशी कार्यक्रमांतर्गत दक्षिण तालुक्यातील कुडलसंगम येथील संगमेश्वर महाराज मंदिरात येथे आ. देशमुख यांच्यासह तालुक्यातील संत, पुजारी मंडळींच्या हस्ते पूजा करण्यात आली, त्यावेळी आ. देशमुख बोलत होते.
या कार्यक्रमाला ष. ब्र. पंचाचार्य शिवाचार्य महास्वामीजी, कोमरय्या स्वामी मठपती कारकल,अमोगसिद्ध महाराज संजवाड, गुरुनाथ महाराज संगदरी, मलय्या सिद्धय्या स्वामी, शिवशंकर हिरेमठ बरुर, गुरुपायम्मा स्वामी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मंदिरात कोव्हीड नियमांचे पालन करून दिव्य काशी भव्य काशी कार्यक्रमा अंतर्गत पंतप्रधान मोदी यांचा वारणसी येथील कार्यक्रमाचे लाईव्ह कव्हरेज दाखवण्यात आले.
आ. देशमुख म्हणाले, मराठी मधील पहिला शिलालेख असणारे ठिकाण म्हणून भीमा आणि सीना या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले हे स्थान प्रसिद्धी आहेच.याच बरोबर येथील हरिहरेश्वर व संगमेश्वर ही दोन शिव मंदिरे ऐतिहासिक आणि धार्मिक असा वारसा जपत आहेत. या मंदिराचा जीर्णोद्धार पार पडल्यानंतर पर्यटकांसाठी हे आकर्षणाचे स्थान ठरत आहे.
याशिवाय तालुक्यात अनेक धार्मिक स्थळे आहेत, त्याची महिती सर्वांसमोर आणण्याचा पहिला प्रयत्न म्हणून या उपक्रमाची सुरुवात हत्तरसंग कुडल येथून करण्यात येणार आहे.
तालुक्यातील सर्व स्थळे धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून जगासमोर यावे आ आपला प्रयत्न आहे. सुरूवातील उपस्थित असलेल्या सर्व संत, पुजारी मंडळींचा सत्कार करण्यात आला. गावातील ग्रामस्थांनी भजन, किर्तन म्हणून सर्वांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, हणमंत कुलकर्णी, डॉ. हविनाळे, सभापती सोनाली कडते, जि. प. सदस्य अण्णाराव बाराचारे, अप्पासाहेब पाटील, संगप्पा केरके,हणमंत पुजारी, गुरण्णा तेली, प्रशांत कडते, मळसिद्ध मुगळे, संदीप टेळे, गौरीशंकर मेंडगुदले, यतीन शहा यांच्यासह भाजप पदाधिकारी व इतर कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.