सचिन पवार
कुरनूर,दि.१४ : वसुंधरेची एकच हाक, पर्यावरण रक्षणाचा घ्या ध्यास असा निश्चय करत स्वच्छ भारत अभियाअंतर्गत एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी श्रमदानातून अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाची स्वच्छता केली. यामुळे रुग्णालय प्रशासनाने देखील समाधान व्यक्त केले.
अस्वच्छतेमुळे निर्माण होणारी रोगराई आणि सार्वजनिक ठिकाणी निर्माण होणारा कचरा त्याचे योग्यरीत्या विल्हेवाट कशा पद्धतीने लावली पाहिजे हे या अभियानातून एनसीसी विद्यार्थ्यांनी रुग्णालय परिसर स्वच्छ करून दाखवून दिले. यावेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान करून परिसर स्वच्छ करून समाजात स्वच्छतेबद्दल जागृकता निर्माण करण्याचे काम केले.
या अभियानात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड, प्रा.बी.एन. कोणदे,सोमनाथ जळकोटे, एस. एम. डफळे, रुग्णालय कर्मचारी यांच्यासह सी. बी. खेडगी कॉलेज, काशीराया काका पाटील कॉलेज, मंगरुळे हायस्कूल, शहाजी हायस्कूल, महाविद्यालयाचे एनसीसीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हे अभियान यशस्वी केले.
यावेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांना मास्क आणि खाऊ वाटप करून अभियानाचा समारोप करण्यात आला.