---Advertisement---

बॉलीवुडमधील “या” सिनेअभिनेत्रींना झाली कोरोनाची लागण, बीएमसीने कडक पावले उचलण्यास केली सुरुवात

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : बॉलीवुडमधुन एक मोठी बातमी समोर आली आहे. कोरोनामुळे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली आहे. बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, अभिनेत्री अमृता अरोरा, महिप कपूर आणि सीमा खान याना कोरोनाची लागण झाली आहे. याची सुरुवात सिने दिग्दर्शक करण जोहरच्या घरी एक पार्टी आयोजीत करण्यात आले होते. याच पार्टीतून कोरोनाचा संसर्ग सुरु झाला. यानंतर बीएमसीने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वात आधी सलमान खानची वहिनी सीमा खानला कोरोनाची लागण झाली. ती गेल्या ८ डिसेंबर २०२१ रोजी करण जोहरच्या घरी गेट टु गेदरसाठी गेली होती. याच पार्टीत करीना कपूर खान, अमृता अरोरादेखील उपस्थित होत्या. ‘कभी खुशी कभी गम’ या सिनेमाला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ही पार्टी करण जोहरने आयोजित केली होती. यानंतर ११ डिसेंबर २०२१ रोजी सीमा खानचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला

सध्या करीना कपूर कोविड पॉझिटिव्ह आल्यामुळे होम आयसोलेशनमध्ये आहे. दरम्यान करीना कपूरसह अमृता अरोरा, महीप कपूर आणि सीमा खान यांनाही कोरोनाची लागण झाल्यामुळे इतर सेलिब्रिटींना सावध करण्यात आले आहे. दरम्यान आज करीना कपूर आणि अमृता अरोराच्या इमारतीत बीएमसीकडून कोरोना चाचणी शिबिर लावण्यात येणार आहे. यावेळी बीएमसीचे वैद्यकीय पथक दोन्ही इमारतीत आरटीपीसीआर चाचणी करणार आहेत. दरम्यान या बिल्डिंग कंपाऊंड आणि इतर ठिकाणीही सॅनिटायझेशन होणार आहे. शिवाय करण जोहरच्या घरीदेखील सॅनिटाइझ करण्यात येईल अशी माहिती सुत्रांकडुन देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!