ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना, बेळगावात जमावबंदीचे आदेश

बंगळूरू : कर्नाटकची राजधानी बंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बंगळूरमधील सदाशिवनगर येथे ही संताप आणणारी घटना घडली. गुरुवारी रात्री उशिरा रात्रीच्या अंधारात काही समाजकंटकांनी शिवरायांच्या पुतळ्यावर काळा रंग ओतला. बंगळूर येथे घडलेल्या घटनेनंतर शिवभक्त संतापले असून बेळगाव आणि कोल्हापूरात त्याचे पडसाद पाहायला मिळाले.

या घटनेची व्हिडीयो व्हायरल झाला. त्यानंतर रात्री बेळगावमधील संभाजी महाराज चौकात शिवभक्त जमले आणि कानडी समाजकंटकाच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. तर कोल्हापूरात सुद्धा शिवसैनिकांकडून कानडी लोकांचे दुकान तसेच हॉटेल व्यवसाय बंद पाडण्यात आले.

बंगळूर येथे शिवपुतळा विटंबनाप्रकरणी बेळगावात शनिवारी सकाळपासून जमावबंदी आदेश जारी केला आहे. शुक्रवारी रात्री शहरात ठिकठिकाणी दगडफेक प्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले असून २७ जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बेंगळूरुतील या घटनेनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटर्वर तिव्र निशेध व्यक्त केली आहे. दोन दिवस आधी पंत प्रधान मोदी काशी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा जयजयकार करतात आणि भाजपचे राज्य असलेल्या कर्नाटकात छत्रपतींची अशी विटंबना होते.. हे चित्र बेंगळुरू येथील आहे.. धिक्कार!धिक्कार! उठ मराठ्या ऊठ!! अस ट्विट संजय राऊत यांनी केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!