पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या सतर्कतेमुळे वाचले पाच जणांचे प्राण,अक्कलकोट – वागदरी रस्त्यावरील घटना
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.२१ : पोलीस निरीक्षक
अनंत कुलकर्णी यांच्या सतर्कतेमुळे आणि सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे पाच जणांचे जीव वाचले आहेत.
सोमवारी,अक्कलकोट – वागदरी रोडवर रात्री साडे नऊच्या सुमाराला शिरवळवाडी पासून २ किमी अंतरावर ही घटना घडली. भरधाव वेगाने जाणाऱ्या बलकर सिमेंट गाडी चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रोड लगत असलेल्या खड्यात ही गाडी पलटली.यामध्ये पाच जण अडकले होते.यानंतर आरडा ओरड सुरू होती.त्यानंतर प्रत्यक्षदर्शीनी डायल ११२ नंबरवरून रात्री पावणे दहाच्या सुमारास कॉल केला.कॉल आल्या आल्या १५ ते २० मिनिटात पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.आणि सोबत पोलीस अंमलदार व शेजारील गावातील २५ ते ३० लोकांना बोलावून मदतीसाठी पुढे गेले. त्यांच्या मदतीने तब्बल तीन ते साडेतीन तास शर्थीचे प्रयत्न करून रात्री एक सुमारास या सर्वांना बाहेर काढले.
यात एक ५० वर्षाचा इसम, एक ३० वर्षाची महिला, एक १४ वर्षाचा मुलगा, एक १३ वर्षाची मुलगी , एक चालक अशा पाच व्यक्तींचे प्राण वाचवून बाहेर काढले.या घटनेत कुणाचा पाय अडकलेला होता तर कुणाचा हात अशा अत्यंत गंभीर परिस्थितीत एक जेसीबी, एक क्रेन व एक हायड्रा मागवली व गाडीत अडकलेल्या पाच व्यक्तींना सुखरून बाहेर काढण्यात यश आले.या ठिकाणी त्यांच्या मदतीला सपोनि भावीकट्टी , पोसई मुजावर , वेंकटेश सुतार , विपिन सुरवसे, राम चौधरी, बशीर शेख, अनिल चव्हाण, गजानन शिंदे, सतिश आवले, लिंगय्या स्वामी, रणजीत अवताडे , अंमलदार व ग्रामस्थ होते.
वेळेत पोचल्यामुळे
वाचले प्राण
ही घटना खूप विदारक होती आणि आम्ही
वेळेत नाही पोहोचलो असतो तर मात्र चित्र वेगळे असले असते.आम्ही वेळेत पोचल्यामुळे सर्वांना बाहेर काढण्यात यश मिळाले.त्यातील काही जण किरकोळ जखमी झाले आहेत पण या सर्वांचे प्राण वाचले हे महत्वाचे आहे. वाचवण्यात आम्हाला सर्वांना यश आले.
याचे समाधान वाटते.
अनंत कुलकर्णी, पोलीस निरीक्षक