मोठी बातमी! देशात लवकरच नाकाद्वारे देण्यात येणारी लस नागरिकांना मिळणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली घोषणा
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी देशाला संबोधित करताना एक मोठी घोषणा केली. ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांना लस सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. लवकरच देशात अनुनासिक आणि डीएनए लसही सुरू करण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दलही माहिती दिली. १० जानेवारीपासून आरोग्य सेवक, डॉक्टर्स तसंच फ्रंट लाइन वर्कर्सना बूस्टर डोस देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे.
My address to the nation. https://t.co/dBQKvHXPtv
— Narendra Modi (@narendramodi) December 25, 2021
देशात कोरोनाचे संकट आले, त्याला रोखण्यासाठी आपण लसीकरण सुरू केले. मागील वर्षी १६ जानेवारीपासून आपण नागरिकांना लसीकरण सुरू केले होते. देशातील नागरिकांनी या अभियानाला साथ दिली. त्यामुळे भारतात १४१ कोटी लोकांचे लसीकरण करण्याचे अभूतपूर्व आणि अवघड असे लक्ष पार केले, अजूनही देशभरात लसीकरण वेगाने सुरू आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.
लस बाजारात कधी उपलब्ध होणार?
देशभरासह संपूर्ण जगात ओमिक्रॉनचे संकट वाढत आहे. या पार्श्वभूमीवर DGCI १२ ते १८ वयोगटील मुलांसाठी भारत बायोटेकच्या लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजूरी दिली आहे. कोरोनाचे संकट वाढत असताना या बद्दल चर्चा सुरू होती. अखेर आज त्यावर निर्णय घेण्यात आला आहे. १५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणासाठी भारत बायोटेकच्या ज्या लसीला आपात्कालीन वापरासाठी मंजूरी मिळाली आहे, जानेवारी महिन्यात बाजरात येण्याची शक्यता आहे. त्यानंतर किशोरवयीन मुलांना ही लस देण्यात येईल.