राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री करणे ,एखाद्या व्यक्तीचे कार्य आवडले तर त्याचे कौतुक करणे, हा माझा स्वभाव..
आज राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका व्यक्तीच्या कार्याबद्दल निश्चितच काहीतरी बोलावेसे वाटते …कारण ती आता फक्त एक व्यक्तीच नाही तर आता तोे झाला आहे एक विचार, एक व्यक्तिमत्त्व… अर्थातच अक्कलकोट तालुक्याचे युवा नेते सचिन दादा कल्याणशेट्टी….!!!
सचिन दादांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली, तेव्हा अनेकांच्या चेष्टेचा विषय असलेला हा युवक भविष्यात तालुक्याचे नेतृत्व हातामध्ये घेईल असे कोणासही वाटले नव्हते. हन्नूर च्या सरपंच पदावर विराजमान झालेला हा युवक उद्याच्या काळात तालुक्याच्या आमदार पदाला गवसणी घालतोय, ही काही साधी गोष्ट नव्हती…हा सबंध प्रवास थक्क करणारा असाच आहे….
स्व.पंचप्पा कल्याणशेट्टी सरांचा राजकीय आणि सामाजिक वारसा चालवत असताना विवेकानंद प्रतिष्ठान च्या माध्यमातून एक सक्षम संघटन उभे केले.
तालुक्याच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना विवेकानंद प्रतिष्ठान असो किंवा भाजप चे पद.. या प्रत्येक पदाचा अथवा संघटनेचा उपयोग लोकहितासाठी करणे हीच तर दादांची भूमिका आहे…म्हणूनच आपले प्रतिष्ठान हे राजकीय सोयीसाठी नाही, तर जनतेच्या हितासाठी आहे हे दाखवून दिले..या सर्व क्षेत्रात त्यांना मोठी साथ लाभली ती म्हणजे सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांची…
दुर्दैवाने स्व. पंचप्पा कल्याणशेट्टी सरांच्या मृत्यूनंतर या संस्था ,संघटन, आणि राजकीय कारकीर्द सचिन दादा सांभाळू शकतात का यावर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष होते…पण एक गोष्ट निश्चित सांगावीशी वाटते, ती म्हणजे या गोष्टी दादांनी नुसत्या टिकवून ठेवल्या नाही तर तर त्यांचा वेग पूर्वीपेक्षा वाढविला आहे.आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी केलेली घौडदौड ही तर आपल्या समोरच आहे..अक्कलकोट आणि दुधनी नगरपरिषदे मध्ये त्यांनी घडविलेल्या चमत्काराने तर संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष त्यांच्याकडे वेधले .जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये त्यांनी एकहाती दिलेली लढत तर भल्याभल्यांना विचारच करायला लावून गेली.या वेळीही सुभाष बापूंची भक्कम साथ दादांना लाभली..
काही वर्षांपूर्वी मी कुठेतरी सचिन या नावातील प्रत्येक शब्दाला दिलेला अर्थ वाचला होता..
तो अर्थ असा होता….
स-सचोटी
चि-चिकाटी
न- नम्रता
—- सचिन—आज दादांकडे पाहिल्यावर यातील प्रत्येक शब्द किती खरा व समर्पक आहे. व तो दादांच्या बाबतीत किती तंतोतंत खरा आहे हे दिसते..
मितभाषी व मृदुभाषी असणारेदादा, मित्रांमध्ये आवडीने रमणारे दादा कार्यकर्त्यांमध्येही अगदी सहजतेने रमतात.अगदी सामान्यातल्या सामान्य कार्यकर्ताही दादांना हक्काने एखादे काम सांगू शकतो,आणि दादाही तो प्रश्न सोडवण्यासाठी मनापासून प्रयत्न करतात. इतरांवर टीका करण्यापेक्षा आपले काम करण्यातच दादा धन्यता मानतात.
सामुदायिक विवाहसोहळा असेल, शहराच्या स्वछतेसाठी त्यांनी घेतलेली भूमिका असेल,शैक्षणिक क्षेत्रात केलेले कार्य असेल,किंवा ग्रामीण भागातील विकासाची भूमिका असेल प्रत्येक बाबतीत त्यांचा अभ्यास आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी घेतलेला ध्यास नक्कीच कौतुकास्पद आहे…
अक्कलकोट तालुक्यात रामदेव बाबांच्या उपस्थितीत योग शिबिर भरवून त्यांनी तमाम जनतेला आरोग्याप्रति जागरूक केले. आणि सर्वसामान्य लोकांनाही योग शिबिरात सहभागी करून घेतले.
योग शिबिरासाठी अक्कलकोट मध्ये खुद्द योग गुरू रामदेव बाबा येणे हाही मोठा योगायोगच म्हणावा लागेल…
आता पर्यंत भाजपमधील अथवा कोणत्याही पक्षातील नेत्याने चांगले कार्य केले असेल तर त्यास चांगले म्हणणे हा माझा स्वभाव आहे.फक्त वास्तव मांडले.
असा या मनमिळाऊ युवा नेत्याच्या आणि त्यांच्या तमाम कार्यकर्त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होऊन, दादांच्या हातून तालुक्याचा विकास व्हावा, व तालुका सुजलाम सुफलाम व्हावा हीच सदिच्छा…!!!
– राजकुमार झिंगाडे, अक्कलकोट