अक्कलकोट, दि.१ : अक्कलकोट तालुक्यातील चप्पळगाव ग्रामपंचायतीमार्फत शासनाच्या विविध योजनेअंतर्गत सध्या ५० लाखांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.या सर्व कामाची पाहणी सरपंच उमेश पाटील यांनी अधिकारी
व पदाधिकाऱ्यांसह केली.आणखी काही मोठी कामे प्रस्तावित आहेत तेही पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील,असे पाटील यांनी सांगितले.काही कामे पंधराव्या वित्त आयोगातून सुरू आहेत.झोपडपट्टी,बसवनगर येथेही काम सुरू आहे.साधारण ५० लाखांची कामे युद्धपातळीवर सुरु असून यात भूमिगत गटार, सिमेंट काँक्रीट रस्ता,दोन अंगणवाड्याची कामे,व्यापारी गाळे अशी कामे वेगाने सुरू आहेत.त्याशिवाय दलित वस्तीमध्ये शौचालय व पेव्हर ब्लॉकची कामे सुरू आहेत.शनिवारी त्यांनी वार्ड क्रं.१ येथे अशोक अकतनाळ घर ते घनशाम दुबे यांच्या घरापर्यंत सुरू असलेल्या भूमिगत गटारीच्या कामाची पाहणी केली.यावेळी बांधकाम विभागाचे अधिकारी चंद्रशेखर पाटील यांच्यासह ग्रा.पं.सदस्य महिबुब तांबोळी,अशोक अकतनाळ,सुरेश सुरवसे,प्रकाश बुगडे,शिवलिंगप्पा बडुरे,उमेश सोनार आदी उपस्थित होते.या कामाबद्दल जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.