ध्यास विश्वसार्ह बातमीचा

समाजाचे ऋण फेडण्यासाठी विधायक कार्य करावे : म्हेत्रे, अक्कलकोट येथे माळी समाज नूतन कार्यकारणी व दिनदर्शिकेचे प्रकाशन

अक्कलकोट, दि.१ : समाज बांधवांनी समाजाचे ऋण फेडण्यासाठी एकत्रित येऊन समाजासाठी विधायक कार्य करावे,असे आवाहन आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.अक्कलकोट येथे वीरशैव माळी समाज शहर अक्कलकोट नुतन कार्यकारिणीचा पदग्रहण व दिनदर्शिका प्रकाशन सोहळा पार पडला.त्यावेळी ते बोलत होते.
हा कार्यक्रम म. नि. प्र. बसवलिंग महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.वीरशैव माळी समाज शहर अक्कलकोट कार्यकारिणी,वीरशैव लिंगायत माळी युवक संघटना, अक्कलकोट,महाराष्ट्र माळी समाज महासंघ, शाखा-अक्कलकोटच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी २०२२ सालाकरिता दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले व तसेच नुतन शहर कार्यकारीणीचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी अध्यक्ष म्हणून मल्लिनाथ नंदीकोले,उपाध्यक्ष म्ह्णून डॉ. बसवराज चिणकेकर,सचिव म्हणून विजयकुमार हडलगी यांची निवड करण्यात आली.यात अशोक म्हेत्रे हे सहसचिव तर वीरेश कोळ्ळे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.सदस्य म्ह्णून राजशेखर म्हेत्रे शिवशंकर नवबागे,गिरीश माळी, प्रसाद दुधनी, सिद्धाराम माळी, ओंकार आडवितोटे या सर्व पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी चि.सर्वज्ञ बाळकृष्ण म्हेत्रे यांचा नीट युजी २०२१ मध्ये ६१५ गुण घेऊन एमबीबीएस प्रवेशासाठी पात्र झाल्याबद्दल सन्मान करण्यात आला.यावेळी दुधनी बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे,कु.शीतल म्हेत्रे,महिला काँग्रेसच्या सुनिता हडलगी आदींची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विजयकुमार हडलगी,शिवशंकर बिंदगे,काशिनाथ गोळ्ळे , अप्पू पराणे, माल्लिनाथ नंदिकोले, शेखर अडवितोट, प्रकाश कनाळ, विश्वनाथ हडलगी, विरेश कोळ्ळे, काशिनाथ इसापुरे, शिवचलप्पा काळी, विजयकुमार लिंबीतोटे, मल्लिनाथ बहिर्जे, बाबूराव रामदे, शशीकांत लिंबीतोटे आदींनी प्रयत्न केले.यावेळी अक्कलकोट शहर व तालुक्यातील बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशंकर बिंदगे यांनी केले. बाळकृष्ण म्हेत्रे यांनी सूत्रसंचलन केले.तर आभार हडलगी यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!