ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसींवर केलेल्या टीकेवर भाजप नेत्यांनी चढवला जोरदार हल्लाबोल

मुंबई : “ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही. कारण जेव्हा मंडळ आयोग आला तेव्हा मंडळ आयोगाचे आरक्षण ओबीसींसाठी होते, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, लढायला होते ते महार आणि दलित होते. कारण ओबीसींना लढायचे नसते,” असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. आता यावर पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. जितेंद्र आव्हाडांनी ओबीसींवर केलेल्या टीकेवर माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनखुळे, विधान परिषदेचे विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन व्हिडीओ ट्वीट करत जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केला आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांनी ट्वीटमध्ये म्हणाले, “जितेंद्र आव्हाड म्हणतात माझा ओबीसीवर विश्वास नाही, कारण मंडल आयोग येताना ते लढले नाहीत. आव्हाड कोणता इतिहास वाचतात माहीत नाही, पण मंडल आयोगाला प्रस्थापितांनी विरोध केला. वंचितांच्या आरक्षणाला नाक मुरडली. शेकडो ओबीसींनी स्वत:ला पेटवून घेतले होते. हा ओबीसींचा इतिहास माहीत नाही का तुम्हाला? कदाचित प्रस्थापितांना खुष करण्यासाठीचे ते कंत्राटी कामगार आहेत,” अशी टीका त्यांनी केली.

‘जितेंद्र आव्हाड हे खळबळजनक वक्तव्य करायला माहीर आहेत, अशा वक्तव्याने समाजात तेढ निर्माण करण्याचे काम ते नेहमी करत असतात. त्यांनी ओबीसी समाजाची माफी मागावी. कारण ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, याची किंमत त्यांना मोजावी लागेल’, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं आहे.

माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनखुळे यांनी पत्रकार परिषद घेत जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसीनबाबत केलेले वक्तव्य निंदनीय आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार त्यांचा राजीनामा घेतील का, असा सवाल भाजपचे प्रदेश सरचिटणीस व विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!