इस्रायल : जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने इस्रायलमध्येही कहर केला आहे. इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉनचा फैलाव झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेल्याची भीती व्यक्त होत आहे. इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात कोरो नाची रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे उच्च अधिकारी डॉ. शेरॉन अॅलरॉय-प्रीस यांनी सांगितले. आरोग्य विभाग कोरोना आणि ओमायक्रॉन रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र, ही आतापर्यंतची सर्वात मोठी लाट असल्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले.
देशात वाढणारा कोरोना आणि ओमायक्रॉनचा संसर्ग कमी करण्याचा सर्वतो परीप्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, सातत्याने रुग्णसंख्या वाढत असल्याने याचा मोठा फटका बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. फक्त ओमायक्रॉनच नाही तर कोरोना रोखण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. आरोग्य अधिकारी देशात ओमायक्रॉन बळावण्याची वाट बघत आहेत, जेणेकरून जनतेमध्ये समूह प्रतिकारशक्ती (हर्ट इम्युनि टी ) निर्माण होईल, अशी चर्चा आहे. या आरोपांचा डॉ. शेरॉन प्रीस यांनी इन्कार केला. या व्हेरिएंटची संक्रमणक्षमता जास्त असल्यानेच रुग्ण वाढत आहेत. आरोग्य यंत्रणा ही लाट बळावण्याची किंवा समूह प्रतिकारशक्ती विकसीत होण्याची वाट बघत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केल.
2019 पासून कोरोना व्हायरस आढळल्या पासून तो सातत्याने स्वरुप बदलत आहे. कोरोनाची लागण झालेल्यांना आणि त्यावर मात केलेल्यांना ही आता ओमायक्रॉनची लागण होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण समूह प्रतिका शक्तीचा विचारच करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. कोरोना मुक्त झालेल्या आणि लसीकरण झालेल्यांना ही याची लागण होत आहे.
ऑमायक्रॉन इतर व्हेरिएंटपेक्षा कमी धोकादायक असला तरी त्यामुळे मोठ्या प्रमाणावर संक्रमण होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत असल्याचे त्यां नी सांगितले. देशात अशाच पद्धतीने कोरोना आणि ओमायक्रॉन वाढत राहिला तर लॉकडाऊन शिवाय पर्याय नसल्याचे शेरॉन यांनी सांगितले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने निर्बंधामुळे काहीही फायदा होणार नाही, असे त्याम्हणाल्या.
कोरोना आणि ओमायक्रॉन रोखण्यासाठी सर्व उपाययोजना कुचकामी ठरल्या आहेत. त्यामुळे लॉकडाऊन हाच शेवटचा पर्याय असल्याचे इस्रायलमधील कोरोनाचे तज्ज्ञ सलमान झारका यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीत निर्बंधामुळे फायदा होणार नसल्याचे दिसत आहे. तसेच या व्हेरिएंटच्या फैलावाचा वेग पाहता, समूह प्रतिकारशक्ती विकसीत होण्याची शक्यता कमी असल्याचे ते म्हणाले.
या वेळी त्यांनी देशातील रुग्णसंख्येची माहितीदिली. रविवारी 6, 576 नवे रुग्ण आढळले होते. तर सोमवारी नव्या रुग्णांची संख्या 7,569 झाली आहे. देशात एकूण 42,364 सक्रीय रुग्ण असून 108 जणांची प्रकृती गंभीर आहे. तर मृत्यूची संख्या 8,247 वर पोहचली आहे.