ध्यास विश्वसार्ह बातमीचा

समाजाच्या विकासाची वृत्ती उपजत असावी लागते : म्हेत्रे, भरमशेट्टी यांच्या पुण्यतिथीनिमित्त १५४ जणांचे रक्तदान

अक्कलकोट : स्वतःसाठी जगणाऱ्या लोकांपेक्षा जो इतरांसाठी जगतो,त्याच्या पाठीशी नेहमीच समाज उभा राहतो.हे ज्याला कळते, तो खरा माणूस. याच भावनेतुन स्व.काशिनाथ भरमशेट्टी यांनी स्वतःचे आयुष्य समाजाच्या कल्याणासाठी समर्पित केले. त्यांची समाजाविषयीची तळमळ ही उपजत होती, असे प्रतिपादन माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांनी केले.

स्वामी समर्थ कारखान्याचे उपाध्यक्ष काशिनाथ भरमशेट्टी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमीत्त हन्नुर (ता.अक्कलकोट) येथे विविध कार्यक्रम पार पडले.यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अक्कलकोटच्या नगराध्यक्षा शोभाताई खेडगी होत्या.

पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले की, स्व.भरमशेट्टी यांची चपळगाव मतदारसंघातील प्रश्नांसाठी नेहमीच धडपड असायची. त्यांचे अधुरे कार्य पूर्ण करण्यासाठी भरमशेट्टी परिवाराकडून तत्परतेने कार्य सुरू आहे, ही बाब गौरवास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मनोगत व्यक्त करत भरमशेट्टी यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.

व्यासपीठावर पंचायत समितीचे सभापती अॅड. आनंदराव सोनकांबळे,उपसभापती प्रकाश हिप्परगी, जि.प.सदस्य शिवानंद पाटील, मल्लिकार्जून पाटील,आनंद तानवडे, माजी उपसभापती सिध्दार्थ गायकवाड,माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे, काॅग्रेसचे
जिल्हा कार्याध्यक्ष अश्पाक बळोरगी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, शिवसेनेचे संजय देशमुख, के.बी.प्रतिष्ठानचे संस्थापक विश्वनाथ भरमशेट्टी, डाॅ.नेहा भरमशेट्टी,
क्रांती दर्गोपाटील,राजू भरमशेट्टी,उत्तम गायकवाड, तुकाराम बिराजदार,व्यंकट मोरे, राजू गायकवाड, राजू चव्हाण,
मनिष निकाळजे उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भरमशेट्टी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्यावर आधारित दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. के.बी.प्रतिष्ठानच्यावतीने गरजूंना ब्लॅकेटचे
वाटप करण्यात आले. रक्तदान शिबीरात
१५४ जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.
दरम्यान प्रतिष्ठानच्यावतीने दिवसभर महाप्रसादाचा लाभ घेतला.सर्व कार्यक्रम शासनाच्या निर्देशानुसार सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत पार पडले. उपस्थितांसाठी सॅनिटायजर व मास्कची व्यवस्था करण्यात आली होती.

यावेळी तुकाराम दुपारगुडे, संजय बाणेगांव, चंद्रकांत जंगले,सिध्दाराम भंडारकवठे, सोपान निकते, नरेंद्र जंगले,चंद्रकांत रोट्टे, निरंजन हेगडे,प्रा.निलप्पा भरमशेट्टी,अमोल हिप्परगी,अबुजर पटेल, महादेव वाले, अप्पाशा हताळे,माजी सरपंच बसवराज सुतार, प्रदीप वाले, प्रकाश सुरवसे, रामु समाणे, शाकीर पटेल,निलप्पा घोडके, दिलीप काजळे यांच्यासह चपळगाव पंचक्रोशीतील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के.बी.प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव भरमशेट्टी, रमेश छत्रे, नितीन भरमशेट्टी, गौरू भरमशेट्टी, मिलन भरमशेट्टी,लक्ष्मण पाटील,नागनाथ बाळशंकर, शैलेश पाटील, प्रविण हताळे, महादेव बंदिछोडे यांच्यासह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गुरूनाथ पारतनाळे यांनी तर आभार विश्वनाथ भरमशेट्टी यांनी मानले.

◆ भविष्यात महिलांच्या रक्तदानासंदर्भात प्रयत्नशील

भरमशेट्टी यांची कन्या डाॅ.नेहा भरमशेट्टी यांनी मनोगत व्यक्त करताना महिलांच्या सशक्त आरोग्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.चपळगाव भागातील महिलांच्या रक्तात आवश्यक घटकांचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातुन विविध उपक्रम राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. तसेच भविष्यात जास्तीत जास्त महिलांनी मोठ्या प्रमाणावर रक्तदान करण्यासाठी कशा प्रवृत्त होतील यासाठी प्रयत्न असेल,असे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!