सचिन पवार
अक्कलकोट दि.११ : नाईन महाराष्ट्र बटालियन एनसीसी आणि सी बी.खेडगी कॉलेज अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित करण्यात आलेल्या सात दिवसीय कॅम्प समारोप करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य धबाले हे होते.मनोगत व्यक्त करताना धबाले म्हणाले की, जीवनात पुढे यायचं असेल विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण असणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन यावेळी धबाले यांनी केले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन नंदीनी शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन वैष्णवी साळुंखे यांनी केले.
यावेळी हवलादर प्रवीण ढोरे, नायक राजाराम चौगुले, डॉ. कोणदे, एस एम डफळे, के के पी कॉलेजचे मणियार आणि एनसीसी कॅडेट उपस्थित होते. ही कॅम्प सोलापूरमधील सोरेगव येथील एस आर पी एफ कॅम्प येथे आयोजित करण्यात आली होती. मात्र वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही कॅम्प कॉलेज ठिकाणी आयोजित करण्याचा निर्णय बटालियने घेतला आहे.
या अनुषंगाने सात दिवसीय कॅम्प मध्ये एनसीसी कॅडेट ना ड्रिल प्रशिक्षण, शस्त्र प्रशिक्षण, मानचित्र अध्ययन, क्षेत्र व युद्धकौशल्य, आदी विषयासंदर्भात आणि बी. आणि सी. प्रमाणपत्र परीक्षासाठी उपयुक्त असलेल्या सर्व विषयावर चर्चा करून व्यवस्थितरीत्या मार्गदर्शन यावेळी कॅडेट ना करण्यात आले.
या कॅम्पस शिबिरामध्ये बेस्ट कॅडेट म्हणून सानिया शेख, आणि कृष्णा पुजारी यांना गौरविण्यात आले असून या सात दिवसाच्या कॅम्प मध्ये विविध विषयवर कॅडेट ना मार्गदर्शन शिबिर ही आयोजन करण्यात आले होते. सात दिवसीय कॅम्प व्यवस्थित पार पाडण्यासाठी मेहबूब शेख, समर्थ सोमवंशी, अजय गवंडी, श्री दसाडे, सुजाता अनंतपुरे, आकाश होसमणी, बिरणा घोडके, आदींनी परिश्रम घेतले.