---Advertisement---

पोलीस महासंचालक के.व्यंकटेशन यांनी घेतले स्वामी समर्थांचे दर्शन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि. ११ : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात होत असलेले बदल व अंतर्गत परिसरातील विविध कामे पाहून आपणास समाधान लाभले आहे. भाविकांना जास्तीत जास्त सोयीस्कर पद्धतीने स्वामी दर्शनाचा लाभ घेता यावा याकरिता समितीकडून हे बदल करण्यात येत आहेत. वटवृक्ष मंदिरातील अंतर्गत बदल हे काळाची गरज असल्याचे मनोगत महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक के व्यंकटेशन यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सपत्निक भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले.

यावेळी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना व्यंकटेशन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, अक्कलकोट नॉर्थ पोलीस ठाण्याचे पीआय अनंत कुलकर्णी, साऊथ पोलिस स्टेशनचे पीआय प्रदीप काळे, साऊथ पोलिस स्टेशनचे पीएसआय छबुराव बेरड, उत्तर पोलीस ठाण्याचे गोपनीय खात्याचे धनराज शिंदे इत्यादी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!