ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आधी शाळा सुरू करा, लग्न समारंभाला परवानगी द्या, दंड आकारणी थांबवा

अक्कलकोट दि,१७ : आधी शाळा सुरू करा, लग्न समारंभाला पन्नास टक्के क्षमतेने परवानगी द्या,मास्क बाबत प्रबोधन करा दंड फाडू नका आदि मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अक्कलकोट तहसीलदारा मार्फत पाठवण्यात आले. सोलापूर जिल्हा शेतकरी सुकाणू समितीचे कार्याध्यक्ष स्वामींनाथ हरवाळकर यांच्या पुढाकाराने हे निवेदन देण्यात आले.या आंदोलनात अक्कलकोट तालुका पालक संघ, या संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या वेळी बोलताना हरवाळकर म्हणाले, दोन शैक्षणिक वर्षात ऑनलाइन शिक्षणामुळे मुले पॉर्नच्या आहारी जाऊन शिक्षणा ऐवजी मुले बिघडल्याचे वास्तव समोर आले आहे. अन्य देशात लॉकडाऊन काळात कधीच शाळा बंद झाल्या नाहित. लग्न समारंभासाठी पन्नास टक्के क्षमतेची परवानगी द्यावी, मास्क बाबत जनजागृती न करता थेट पठाणी दंडाची आकारणी पोलीस करीत आहेत ते थांबवावे, दारू दुकाने डान्सबार, सिनेमा गर्दीत चालू असल्याने सरकारच्या विरोधाभासी निर्णयाला जनता कंटाळली आहे.

या आशयाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. निवेदनाची प्रत तहसीलदार बाळासाहेब शिरसाट यांच्या मार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांना पाठवण्यात आले आहे. या वेळी बसवराज बनसोडे, फतरु मुल्ला, बसवराज बाके, पुत्रप्पा पाटील, नसरू बागवान आदि मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!