ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात पुन्हा लसीकरणाचा वेग वाढला

मारुती बावडे

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आरोग्य विभागाकडून युद्धपातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्‍वभूमीवर तालुक्यात दुसऱ्या डोसचे ५४ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कर्मचारी प्रयत्नशील आहेत. पहिला डोस मात्र १०३ टक्के पूर्ण झाल्याने आरोग्य विभागाने जिल्ह्यात अव्वल क्रमांक पटकावला आहे. तसेच बूस्टर डोस देण्याचेही काम युद्धपातळीवर सुरू असून त्यात प्रामुख्याने फ्रन्टलाइन वर्करना हा डोस देण्यात येत आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विन करजखेडे यांनी दिली.

कोरोनाच्या आकडेवारीवर जर नजर एक नजर टाकली तर सध्या तालुक्यात २३ रुग्ण पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये सात रुग्ण हे अक्कलकोटमध्ये उपचार घेत आहेत.  तर १६ रुग्ण हे विविध हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही, असेही त्यांनी सांगितले. सध्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना तसेच फ्रंटलाईनमध्ये पोलीस, आरोग्य कर्मचारी प्रशासकीय कर्मचाऱ्यांना बूस्टर डोस देण्यात येत आहे. शासनाच्या गाईडलाईन्सनुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

कोरोना व ओमायक्रोन रुग्णांची संख्या सर्वत्र वाढल्याने लस येणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.  त्याचबरोबर अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयांमध्ये लसीची सक्ती करण्यात आल्याने लसीकरणाचा वेग वाढला आहे. ज्यांच्या दुसऱ्या दोनशे तारीख
पूर्ण झाली आहे. अशांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे.

तालुक्यात २३ रुग्ण

दहा ते बारा दिवसापूर्वी अक्कलकोट तालुका हा मुक्त होता मात्र मागच्या दहा ते बारा दिवसातच तेवीस रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी याबाबत खबरदारी घेण्याची गरज आहे. कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे व स्वतःचे आरोग्य सांभाळावे – डॉ.अश्विन करजखेडे,तालुका वैद्यकीय अधिकारी

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!