मार्च-एप्रिलमध्ये होणाऱया बारावीच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना (9 फेब्रुवारी) आजपासून ऑनलाइन हॉलतिकीट देण्यात येणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर आज दुपारी एक वाजल्या पासून कॉलेज लॉगइनमध्ये डाऊनलोड करण्याकरिता हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे राज्य शिक्षण मंडळ सचिव डॉ. अशोक भोसले यांनी स्पष्ट केले आहे.
शिक्षण मंडळाच्याया वेबसाईटवरून कॉलेजनी हॉलतिकिटाची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना द्यायची आहे. या प्रिंटवर मुख्याध्यापक, प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, अशा सूचनाही शिक्षण मंडळाने दिल्या आहेत.
हॉलतिकिटात काही चुका असतील तर कॉलेजनी विभागीय शिक्षण मंडळाशी संपर्क साधायचा असून हॉलतिकिटावरील विद्यार्थ्यांचा फोटो, स्वाक्षरी, नाव या संदर्भातील चुका कॉलेज स्तरावर सुधारून त्याची प्रत विभागीय शिक्षण मंडळाकडे सादर करायची आहे. तसेच विद्यार्थ्याकडून हॉलतिकीट हरवल्यास दुसरी प्रत विद्यार्थ्याला द्यायची असून त्यावर लाल शाईने द्वितिय, असा उल्लेख करण्याच्या सूचनाही भोसले यांनी दिली आहे.