ध्यास विश्वसार्ह बातमीचा

८० फुट खोल विहिरीत पडलेल्या सापाची केली सुटका;नागणसुरातील घटना

 

अक्कलकोट, दि.१० : अक्कलकोट तालुक्यातील नागणसुर येथील मारुती माने यांचा शेतामध्ये असलेल्या विहिरीत चक्क साप पडला.नंतर सर्पमित्रांनी त्याची सुटका करत त्याला जीवदान दिले आहे.सापाच्या मानेकडून शेपटीपर्यंतचा भाग पाण्यामध्ये अडकला
होता.पण सुदैवाने सापाने आपले तोंड मात्र
पाण्यामध्ये सुरक्षित ठेवले होते.

सापाची सुटका करण्याकरिता माने यांनी अक्कलकोट येथील सर्पमित्र शिवराज कोळी यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. सर्पमित्र कोळी, अक्कलकोट स्नेक रेस्क्यू टीमचे अध्यक्ष अमोल बेटेगिरी व महेश बनसोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता ८० फुट खोल विहिरीत साडेपाच फुट लांबीचा नाग जातीचा साप पडल्याचे दिसून आले.त्याला किंचितही हालचाल करणे शक्य नव्हते. या परिस्थितीतून सापाला लवकरात लवकर वर काढणे अतिशय गरजेचे होते.आणि वर
काढून त्याला त्वरित निसर्गात मुक्त करण्यात आले.सर्पमित्रांच्या या तत्परतेचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!