विकास कामे होण्यासाठी अधिकारी व पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयक आवश्यक : म्हेत्रे ; जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा निरोप समारंभ
अक्कलकोट,दि.१४ : जनतेची कामे वेळेत होण्यासाठी आणि प्रशासकीय स्तरावर विकास कामांचा पाठपुरावा होण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये एकजूट आवश्यक आहे तरच पंचायत समितीचा देखील लौकिक वाढेल,असे प्रतिपादन माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले.
सोमवारी,अक्कलकोट पंचायत समिती येथे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमात ते बोलत होते.पुढे बोलताना म्हेत्रे म्हणाले
की,कोरोना काळात आरोग्य विभागाने व इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी चांगले काम केले.पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी राजकारण न करता
विकास कामे केली.यापुढे अधिकारी व पदाधिकारी यांनी समन्वयाने कामे करावेत. जनतेची कामे करण्यासाठी आपण आहोत. आपण एकमेकांचे दुश्मन नाहीत.जनतेच्या कामासाठी कधीकधी वाद होतात.अधिकारी व पदाधिकारी यांनी जनतेच्या कामांना प्राधान्य देणे गरजेचे आहे,असे म्हेत्रे यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समिती सभापती आनंद सोनकांबळे,उपसभापती प्रकाश हिप्परगी, पंचायत समिती सदस्य गुंडप्पा पोमाजी,जि.प. सदस्य मल्लिकार्जुन पाटील, ज्येष्ठ नेते मल्लिकार्जून काटगांव, गटविकास अधिकारी भारत ऐवळे, जि.प. सदस्या मंगल कल्याणशेट्टी, सिद्धार्थ गायकवाड, राजेंद बंदीछोडे,भौरम्मा पुजारी, विलास गव्हाणे, अ.खय्युम पिरजादे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना सभापती सोनकांबळे म्हणाले,स्वर्गीय सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्याकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या.माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांची मला खूप साथ मिळाली म्हणून मी सभापती झालो. आपला देश शेतीप्रधान,कृषिप्रधान देश आहे .शेतकऱ्यांची कामे झाली पाहिजेत .पंचायत समितीमध्ये शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने येतो.त्यांच्या कामासाठी वेळोवेळी आक्रमक झालो.शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली पाहिजे,असेही
ते म्हणाले.याप्रसंगी मल्लिकार्जून पाटील,मल्लिकार्जून काटगाव, उपसभापती हिप्परगी,गुंडप्पा पोमाजी आदींनी मार्गदर्शन केले.यावेळी गटशिक्षणाधिकारी खुर्शीदीया
शेख,विस्तार अधिकारी पी.एल कोळी,विस्तार अधिकारी तुळजापुरे,उपअभियंता ए.ए.खैरादी, उपअभियंता सपताळे,पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता सुनील कटकधोंड,पशु वैदयकीय अधिकारी दिनेश मुरुमकर, प्रशासन अधिकारी दयानंद परिचारक, वरिष्ठ सहाय्यक सिद्रामय्या मठ, राजेश निकम, अनिल बिराजदार, कनिष्ठ सहाय्यक बसवराज दिंडोरे,राहुल शिंदे,ए.एस.जमादार, राम जाधव, विकास गुळमिरे, अभिमन्यू कांबळे, शरणू पाटील,रेवणप्पा बोरगांव,पर्यवेक्षिका मृणाल शिंदे आदी कर्मचारी उपस्थित होते.