ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आगामी जि.प व पं. स निवडणुका स्वबळावर लढणार; राष्ट्रीय समाज पक्षाची अक्कलकोट शहर व तालुका जंबो कार्यकारिणी जाहीर

 

अक्कलकोट,दि.१५ : आगामी नगरपरिषद, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार आहे.कोणत्याही पक्षाशी युती न करता सर्व ठिकाणी उमेदवार उभे करून
पक्षाची ताकद दाखवून देऊ,असा इशारा जिल्ह्याचे प्रभारी रणजीत सुळ यांनी दिला आहे.रासपचे नूतन तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर यांनी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनिल बंडगर,जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर पुजारी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत अक्कलकोट तालुका व शहर कार्यकरणी जाहीर केली.या निमित्ताने साहिल पॅलेस येथे कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.त्यावेळी ते बोलत होते.अक्कलकोट तालुक्यात आगामी काळात जिल्हा परिषद ,पंचायत समिती आणि नगरपरिषद निवडणूका आहेत या निवडणुकीमध्ये रासपला चांगले वातावरण आहे,असे बंडगर यांनी सांगितले.अक्कलकोट शहर व तालुका नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे..
दाजी कोळेकर – युवक आघाडी तालुका अध्यक्ष,स्वामीराव घोडके – अक्कलकोट शहर अध्यक्ष, राजकुमार बिराजदार- विधानसभा अध्यक्ष, शिवानंद गाडेकर- विधानसभा संपर्क प्रमुख, काशिनाथ निंबाळ – तालुका कार्याध्यक्ष, नागेश उमदी- अक्कलकोट शहर प्रभारी, तिपण्णा घोडके – तालुका उपाध्यक्ष,पिंटू गावडे – तालुका उपाध्यक्ष,विलास पाटील- तालुका उपाध्यक्ष, शंकर कोकरे – वाहतुक आघाडी तालुका अध्यक्ष, महादेव पुजारी- तालुका सरचिटणीस, संतोष शिंदे – तालुका सचिव, सोमनाथ घोडके – तालुका प्रसिद्धी प्रमुख, यलप्पा पुजारी- युवक आघाडी तालुका उपाध्यक्ष, बिरप्पा आळगी- नागणसुर जिल्हा परिषद गट प्रमुख, रेवणसिध्द शेरी- सलगर जिल्हा परिषद गट प्रमुख, सिध्दाराम तोरणी- मैंदर्गी शहर अध्यक्ष, बिरप्पा बंदिछोडे – युवक आघाडी तालुका उपाध्यक्ष, भालचंद्र बन्नी- वागदरी पंचायत समिती गण प्रमुख,मल्लप्पा हिरकुर- वाहतुक आघाडी तालुका उपाध्यक्ष असे नवनियुक्त पदाधिकारी आहेत.या सर्वांचा
मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष माडकर म्हणाले,येत्या १९ एप्रिल रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांचा वाढदिवस आहे त्याचे औचित्य साधून अक्कलकोट तालुक्यातील ५४ गावामध्ये शाखा व ५४ सक्रिय सभासद करण्याचे पक्षश्रेष्ठींनी आदेश दिले आहेत. ते आम्ही पूर्ण करणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन घोडके यांनी केले तर आभार कोळेकर यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!