ध्यास विश्वसार्ह बातमीचा

माजी मंत्री म्हेत्रेंच्या एकसष्ठीनिमीत्त अक्कलकोटमध्ये मंत्र्यांची मांदियाळी ; ८ एप्रिलला भव्य कार्यक्रमांचे आयोजन

 

अक्कलकोट,दि.४ : राज्याचे माजी
गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या एकसष्ठीनिमीत्त येत्या ८ एप्रिल रोजी राज्यातील विविध मंत्री उपस्थित राहणार आहेत.यानिमित्त त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती
समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जून पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अक्कलकोटच्या आजवरच्या विकासामध्ये
म्हेत्रे यांचे फार मोठे योगदान राहिले आहे.यासाठी कार्यकर्त्यांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सिध्दाराम म्हेत्रे यांचा ६१ वा वाढदिवस अक्कलकोट येथील
टिनवाला फंक्शन हाॅलच्या प्रांगणात सायंकाळी ५ वाजता साजरा होणार आहे.यानिमित्त भव्य समाधान शिबीर होईल.त्यामाध्यमातुन तालुक्यातील गोरगरिबांना एकाच व्यासपीठावर शासकीय स्तरावरील कागदपत्रांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे.तसेच भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असून तालुक्यातील बहुसंख्य तरूण व जनतेनी रक्तदान करण्याचे आवाहन संयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे राहणार आहेत.तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण,महसुलमंत्री बाळासाहेब थोरात,अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ,सहकार
व पणनमंत्री बाळासाहेब पाटील,काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार,पाणीपुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री संजय बनसोडे,पालकमंत्री दत्तात्रय भरणे,माजी ग्रामविकास मंत्री बसवराज पाटील,माजी दुग्धविकास मंत्री मधुकरराव चव्हाण,आमदार प्रणिती शिंदे,अफझलपुरचे आमदार एम.वाय.पाटील,आमदार संजयमामा शिंदे,इंडीचे आमदार यशवंतगौडा पाटील,माजी आमदार बी.आर.पाटील,जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील आदींच्या प्रमुख उपस्थितीत म्हेत्रेंचा एकसष्ठी गौरव
सोहळा संपन्न होणार आहे.सदरच्या कार्यक्रमास तालुक्यातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गौरव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.या पत्रकार परिषदेत दक्षिणचे नेते सुरेश हसापूरे,नगरसेवक अशपाक बळोरगी,जेष्ठ नेते मल्लिकार्जून काटगाव,
दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे,अरूण जाधव,सभापती आनंदराव सोनकांबळे,मंगल पाटील आदी उपस्थित होते.

 

महा डिजिटल सभासद
नोंदणी अभियान

या वाढदिवसाच्या कार्यक्रमात तालुक्यात काँग्रेसची महाडिजिटल सभासद नोंदणी होणार आहे.यासाठी पदाधिकारी नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. किमान पंचवीस हजार सभासदांची नोंदणी या कार्यक्रमाच्या दरम्यान होईल.

प्रथमेश म्हेत्रे,सभापती बाजार समिती दुधनी

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!