अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील चप्पळगाव ग्रामपंचायतीला यंदाचा १ लाख रुपयाचा बीमा ग्राम पुरस्कार मिळाला आहे.या माध्यमातून गावाचा विकास साधला जाणार आहे.ज्या गावातून एलआयसीला जास्तीत जास्त इन्शुरन्स जमा होतात त्या गावाला विमा प्रतिनिधीमार्फत हा पुरस्कार दिला जातो.हा पुरस्कार विमा
प्रतिनिधी सुरेश सुरवसे यांच्यामार्फत गावाला मिळाला आहे.यापूर्वीही सन २०२० -२१ चा ५० हजार रुपयांचा पुरस्कार मिळाला होता.त्यातून गावामध्ये ग्रामपंचायतीवर
स्पीकर तसेच नळ पाणी पुरवठा योजनेची कामे झाली होती.यावर्षी मिळालेला निधी विविध विकास कामावर खर्च केला जाणार आहे.सरपंच उमेश पाटील, युवा नेते बसवराज बाणेगाव ,तंटामुक्त अध्यक्ष महेश पाटील, रवीकांत पाटील, आप्पासाहेब पाटील,सिद्धाराम भंडारकवठे,नंदकुमार पाटील,संजय बाणेगाव,श्रावण गजधाने,आंबणप्पा भंगे,ज्ञानेश्वर कदम,महादेव वाले, मनोज इंगोले ,पंडित पाटील, प्रभाकर हंजगे,संजय वाले,सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने हा पुरस्कार मिळाला असल्याचे सांगण्यात आले.हा पुरस्कार ९५ आरचे शाखाधिकारी अरुण मिरगे,विकास अधिकारी योगेश धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.याबद्दल गावकऱ्यांचे
सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अभिमानास्पद
बाब
सलग दोनदा हा पुरस्कार चपळगावला
मिळाला आहे.त्याबद्दल आम्हाला अभिमान वाटतो.यामुळे गावाच्या विकासाला चालना मिळेल.या निधीचा विनियोग चांगल्या प्रकारे करून गावामध्ये सुविधा निर्माण
केल्या जातील.
उमेश पाटील, सरपंच