श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथीनिमित्त अक्कलकोटच्या राजेराय मठात धर्मसंकिर्तन ;उद्यापासून सुरू होणार कार्यक्रम
तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट,दि.१५ : श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४४ व्या पुण्यतिथीनिमित्त सालाबादाप्रमाणे यंदाही राजेराय मठ अक्कलकोट येथे धर्मसंकीर्तनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष ॲड.शरद फुटाणे यांनी दिली.यात परमपूज्य सद्गुरु बेलेनाथ बाबांचा पुण्यतिथी महोत्सव १४ मे ते २ जून दरम्यान पार पडणार आहे.यात शनिवार दि.१६ एप्रिल रोजी विठ्ठल मंदिर
महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांचा भक्ती संगीताचा कार्यक्रम पार पडेल.रविवार दि.१७ रोजी जय हनुमान भजनी मंडळ सोलापूर यांचा भक्तिसंगीताची सेवा, सोमवार दि.१८ रोजी नृत्यकला निकेतन यांचे भक्ती गीतांवर आधारित नृत्यकला हा कार्यक्रम सादर होईल. यात अर्चना पालेकर आणि मयुरी खरात (मुंबई) यांचा सहभाग असेल. मंगळवार दि. १९ रोजी सत्संग महिला भजनी मंडळाचा कार्यक्रम होईल. दि.२० रोजी वटवृक्ष स्वामी महाराज महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांचा कार्यक्रम, २१ रोजी ओम बेला समर्थ महिला भजनी मंडळ यांचे भक्ती संगीत, २२ रोजी सरस्वती महिला भजनी मंडळ सोलापूर यांचे भक्ती संगीत,२३ रोजी श्री स्वामी समर्थ भजनी मंडळ समर्थ नगर, अक्कलकोट यांचे भक्ती संगीत,२४ रोजी गार्गीताई काळे, सोलापूर यांचा भारुडाचा कार्यक्रम होईल.२५ रोजी स्वकुळ साळी समाज भजनी मंडळ, अक्कलकोट यांचे भक्ती संगीत, २६ रोजी सुखदा ग्रामोपाध्ये, अक्कलकोट यांचे प्रवचन, २७ रोजी ह.भ.प मनोहर देगावकर अक्कलकोट यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होईल. हे सर्व कार्यक्रम सायंकाळी ५ ते ७ या वेळेत पार पडणार आहे. यानंतर गुरुवार दि.२८ एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थांच्या पुण्यतिथी निमित्त पहाटे २ वाजता काकड आरती, पहाटे २.३० ते ४ वाजता श्रींची महापूजा,४ वाजल्यापासून स्वामी समर्थ नामावली पठण, चैतन्य पादुकांवर सामुदायिक अभिषेक, दुपारी १२ वाजता महानैवेद्य व महाआरती, १२. ३० ते ३ या वेळेत महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ९ या वेळेत श्री स्वामी समर्थ महाराजांचा पालखी सोहळा, सयोग दिंडी श्री नाशिककर महाराज जवळकर सोलापूर. २९ एप्रिल रोजी सर्व भजनी मंडळ अक्कलकोट तर्फे गोपाळकाला होईल. परमपूज्य सद्गुरु बेलेनाथ बाबांच्या पुण्यतिथी निमित्त २४ मे ते २
जून पर्यंत श्री साई सच्चरित्र पारायण, सत्संग ,
भक्ती संगीत, प्रवचन, अखंड वीणा सप्ताह, महाप्रसाद ,पालखी, रथोत्सव इत्यादी कार्यक्रम साजरा होत आहेत.या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.